शिवरायांनी सुरतला नाही, औरंगजेबाला लुटलं- नरेंद्र मोदी

काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास केल्याची घणाघाती टीका नरेंद्र मोदींनी केली. रायगड किल्ल्यावर शिवप्रतिष्ठान संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे आजचं नरेंद्र मोदींचं भाषण अराजकीय होतं. शिवप्रतिष्ठान संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तब्बल १५ हजारांहून अधिक शिवप्रेमींना गर्दी केली होती.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 5, 2014, 07:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायगड
काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास केल्याची घणाघाती टीका नरेंद्र मोदींनी केली. रायगड किल्ल्यावर शिवप्रतिष्ठान संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे आजचं नरेंद्र मोदींचं भाषण अराजकीय होतं. शिवप्रतिष्ठान संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तब्बल १५ हजारांहून अधिक शिवप्रेमींना गर्दी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्रिवार जयजयकार अशा शब्दात नरेंद्र मोदींनी रायगडावर आपल्या भाषणाची सुरुवात केली. शिवप्रतिष्ठान संस्थेनं आयोजित मानगड ते रायगड अशा पाच दिवसीय किल्ले भ्रमंतीचा समारोपासाठी नरेंद्र मोदी रविवारी रायगड किल्ल्यावर उपस्थित होते. समारोपाच्या या कार्यक्रमाला शिवप्रेमींनी गडावर उपस्थित राहिल्यामुळं परिसरात ठेवण्यात आली होती. यावेळी मोदींनी काही इतिहासकारांच्या मुद्यावर घणाघाती हल्ला चढवला.

शिवाजी महाराजांचे गुजरातमधले वेगवेगळे संदर्भ देत शिवाजी महाराज गुजरातमध्ये कसे लोकप्रिय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न यावेळी नरेंद्र मोदींनी केला. त्याचबरोबर शिवाजी महाराजांसारखा चांगला कारभार देशामध्ये असण्याची गरज असून सर्वांनी दिव्य भारत, भव्य भारताचं स्वप्न पाहिलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान रायगड किल्ल्यावर राजदरबार जगदीश्वराचं मंदिर आणि महाराजांची समाधी याठिकाणी नरेंद्र मोदींनी भेट दिली. रायगडावरील हा सर्व कार्यक्रम कुठल्याही विघ्नाशिवाय पार पाडल्यानं पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ