वाद टाळायला हवेत- उद्धव ठाकरे

लोकप्रतिनिधी आणि पोलिसांमधील वाद चुकीचा असून, असे वाद टाळायला हवेत, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय. भिवंडीतल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाषण केलं.

जयवंत पाटील | Updated: Mar 20, 2013, 11:13 PM IST

www.24taas.com, भिवंडी
लोकप्रतिनिधी आणि पोलिसांमधील वाद चुकीचा असून, असे वाद टाळायला हवेत, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय. भिवंडीतल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाषण केलं.
आमदार निलंबनाच्या मुद्द्यावर सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. या सभेत त्यांनी महिलांच्या सुरक्षेवरुन आणि दुष्काळावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. एका बाजूला लोकप्रतिनिधी आणि दुसऱ्या बाजूला पोलीस यांच्यात वाद होऊ लागले,तर सामान्य जनतेने कुणाकडे पाहायचं? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

5 वर्षांनंतर उद्धव यांची भिवंडीत सभा झाली. या सभेला माजी आमदार साबीर शेख आणि त्यांचे पुतणेही उपस्थित होते.