व्हील रॉड तुटला... रस्त्यावरच पलटली एसटी, ८ जखमी

रत्नागिरी पावसजवळच्या वायंगणीमध्ये एसटी बस पलटी झालीय. या गाडीमध्ये बहुतेक शाळकरी मुले होती. त्यातली काही किरकोळ जखमी आहेत. मात्र, ८ प्रवासी गंभीर आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 2, 2013, 01:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरी पावसजवळच्या वायंगणीमध्ये एसटी बस पलटी झालीय. या गाडीमध्ये बहुतेक शाळकरी मुले होती. त्यातली काही किरकोळ जखमी आहेत. मात्र, ८ प्रवासी गंभीर आहेत.
अपघातानंतर तातडीनं स्थानिकांनी मदत करून जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवलं. एसटीचा व्हील रॉड तुटला आणि बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे ही बस पलटी झाली. वायंगणी गावातून सकाळी नऊ वाजताची एसटीबस रत्नागिरीच्या दिशेने येत होती. बस जवळजवळ ७० प्रवाशी दाटीवाटीनं भरलेले होते. वायंगणी फाट्याजवळ एसटीचा व्हील रॉड तुटला. त्यामुळे बस रत्याच्याकडेला पलटी झाली.
काही प्रवाशांनी एसटीच्या काचा तोडून कसेबसे आपले प्राण वाचवले. मात्र, यातील १० प्रवासी एसटीच्या आतच अडकून होते. त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.