लोकल भजनाची स्पर्धा रंगली...

विकास फाऊंडेशननं आयोजित केलेल्या रेल्वे भजनी मंडळाच्या स्पर्धेत डोंबिवलीच्या ज्ञानेश्वर भजनी मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेला परीक्षक म्हणून आलेल्या ज्ञानेश्वर मेश्राम आणि सचिन बारगजे यांनी गाणी सादर करुन स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

Updated: Apr 29, 2012, 04:53 PM IST

www.24taas.com, डोंबिवली

 

विकास फाऊंडेशननं आयोजित केलेल्या रेल्वे भजनी मंडळाच्या स्पर्धेत डोंबिवलीच्या ज्ञानेश्वर भजनी मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेला परीक्षक म्हणून आलेल्या ज्ञानेश्वर मेश्राम आणि सचिन बारगजे यांनी गाणी सादर करुन स्पर्धकांचा उत्साह वाढवला. मुंबईच्या लोकलमध्ये नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्यांचे खास ग्रुप जमतात.

 

त्यातून मग नामसस्मरणाबरोबर गर्दीचा क्षीण कमी करण्यासाठी भजन म्हटली जातात. अशा रेल्वेतल्या भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी विक्रोळीतल्या विकास फाऊंडेशननं रेल्वे प्रवासी भजन स्पर्धचं आयोजन केलं होतं. यात डोंबिवलीच्या ज्ञानेश्वर रेल्वे भजनी मंडळानं बाजी मारली. त्यांना पाच हजार रुपयांचे पहिले बक्षिस देण्यात आले.

 

तर कल्याणच्या जय हनुमान रेल्वे भजनी मंडळानं दुसरं आणि डोंबिवली दिवा इशल्या श्री स्वामी समर्थ रेल्वे भजनी मंडळानं तिसरा क्रमांक पटकावला. विकास फौंडेशननं आयोजित केलेल्या या स्पर्धेत 'झी २४ तास' मीडिया पार्टनर होतं. परिक्षक म्हणून झेंडा फेम ज्ञानेश्वर मेश्राम आणि हिंदी सारेगम फेम सचिन बारगजे होते. दोघांनी गाणी सादर करुन प्रेक्षकांना खुष केलं. रेल्वे भजनी मंडळांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद देऊन संयोजकांचा उत्साह वाढवला.