मनसेचे कार्यालय `दुकानं` होता कामा नये - राज

आजकाल राजकीय पक्षांची कार्यालये दुकानं झाली आहेत. मात्र, मनसेच्या कार्यालयात सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. या कार्यालयांची इतर पक्षांसारखी `दुकानं` करु नका, असा खोचक सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 31, 2013, 08:44 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,ठाणे
राज्यात काय चाललंय ते कोणालाच कळत नाही. सज्जन माणूस असणारे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून होतो. खूनला दहा दिवस झाले तरी मारेकरी अजून मोकाट कसे? ही राज्य सरकारची निष्क्रियता आहे. लोकांचे प्रश्न सुटत नाही. त्यासाठी हे सरकार बदलले पाहिजे. आजकाल राजकीय पक्षांची कार्यालये दुकानं झाली आहेत. मात्र, मनसेच्या कार्यालयात सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. या कार्यालयांची इतर पक्षांसारखी `दुकानं` करु नका, असा खोचक सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
ठाण्यातील मनसेच्या मुख्य कार्यालयाचे उद‍्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यानंतर गडकरी रंगायतन येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्य सरकरावर जोरदार हल्लाबोल केला. राज यांनी आर आर पाटील यांची नक्कल करत त्यांच्यावर हल्ला चढवला. मेरी झाशी नही छोडूंगी... तसं मी गृहमंत्रीपद सोडणार नाही, अशीच आबांची भूमिका दिसतेय असं म्हणत आर आर कोणत्या क्वॉलिफिकेशनवर गृहमंत्री पदावर आहेत? २००८ मध्ये गृहमंत्रीपदावरुन हकालपट्टी झालेल्या आर आर कसे काय गृहमंत्री होऊ शकतात? सत्तेतले दिवटे दररोज जे काही करत आहेत, त्यावर आता आणखी किती दिवस बोलत राहणार? त्यामुळे या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला उलथवून लावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले.
कोण तो, अतिरेकी. कोठे भटकत होता. मी परप्रांतियांवर टीका केली की लोक मला शिव्या घालतात. पण मग भटकळ कुठे सापडला?... बिहारमध्येच ना?... हे सगळे दहशतवादी बिहारमध्येच कसे काय सापडतात?... तिथे काय कॉलेज आहे का?बिहारमध्ये नालंदा विद्यापीठ होतं ठाऊक आहे, पण हे कुठलं विद्यापीठ?, असा ठाकरी सवाल करत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रातियांवर हल्लाबोल केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून, त्यांनी मांडलेला अंधश्रद्धा निर्मूलनाचा विषय यावर राज यांनी आपल्या शैलीत भाष्य केलं. दाभोलकर बुवाबाजीच्या विरोधात होते. सर्वसामान्यांच्या वैयक्तिक श्रद्धा आणि प्रथांना त्यांचा विरोध नव्हता. त्या जपताना बुवाबाजी किंवा थोतांडाच्या आहारी जाऊ नका. धार्मिक प्रथांच्या नावाखाली दुसऱ्या कोणाचा नरबळी देण्यावरच दाभोलकरांचा आक्षेप होता. मात्र, सरकार अंधश्रद्धाविरोधी कायद्यासाठी त्यांच्या नरबळीची वाट पाहत होते का, अशी खरमरीत टीका राज यांनी यावेळी केली.
सरकारला धारेवर धरणाऱ्या राज यांनी मीडियावरही टीका केली. बलात्कारासारख्या दुदैवी घटनेला टीआरपीच्या फुटपट्टीत अनेक वृत्तवाहीन्या मोजत आहेत. मी काय म्हणतो, महिलांवर बलात्कार होतात ही बाब निंदनीय आहेच. मात्र, मुंबईला दिल्लीतला अशी फुटपटी लावू नको. एकाद्या गावात झालेली घटनाही या मीडियाला का दिसत नाही. या वृत्त वाहिन्या दिल्लीत बलात्कार झाल्यावर त्याविरोधात रान पेटवतात. पण कोल्हापुरातील अल्पवयीन मुलीच्या बलात्काराची त्या दखल सुध्दा का घेत नाहीत, असं का.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

व्हि़डिओ पाहा :