हळदीकुंकवासाठी गेलेल्या महिलेचे दागिने पाच मिनिटांत लंपास

इमारतीतच हळदीकुंकवासाठी गेलेल्या एका महिलेचे दागिने अवघ्या पाच मिनिटांमध्ये लंपास केल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. 

Updated: Jan 31, 2016, 09:11 AM IST
हळदीकुंकवासाठी गेलेल्या महिलेचे दागिने पाच मिनिटांत लंपास title=

कल्याण : इमारतीतच हळदीकुंकवासाठी गेलेल्या एका महिलेचे दागिने अवघ्या पाच मिनिटांमध्ये लंपास केल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. 

कल्याण पश्चिमेकडील सिनेमॅक्स परिसरातील साई-वृंदावन सोसायटीतील एका घरात हळदीकुंकवाचा कार्यक्रम होता. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सरिता रंजन या आपल्या पाच वर्षांच्या मुलाला घरात ठेवून कार्यक्रमाला निघून गेल्या. त्याच दरम्यान चोरीच्या इराद्यानं या इमारतीत घुटमळत असलेला एक चोर रंजन यांच्या घरात घुसला. 

घरी असलेल्या मुलाशी गोड बोलत त्यानं घरातील कपाटाची माहिती मिळवली. त्यानंतर  या चिमुकल्या मुलाला चाकूचा धाक दाखवत कपाटातील दागिने लंपास करत पळ काढला. सरिता घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचं उघडकीस आलं. सुमारे सहा लाखांचा ऐवज घेऊन हा चोरटा पसार झाला.