नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे

By Surendra Gangan | Last Updated: Sunday, April 28, 2013 - 11:28

www.24taas.com,झी मीडिया,सिंधुदुर्ग नगरी
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं शक्ती प्रदर्शन होणार आहे. त्यामुळे ठाकरे काय बोलतात याचीच उत्सुकता आहे.
कुडाळमधल्या ज्या मैदानावर राणेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वस्त्रहरण करण्यासाठी सभा घेतली होती. त्याच मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडं कोकणवासीयांचं लक्ष लागलंय. कोकणातील अणुऊर्जा प्रकल्प, गाडगीळ-कस्तुरीरंगन समिती अहवाल तसेच मायनिंग प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

सुमारे ४० हजार कार्यकर्ते सभेसाठी उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. मालवण विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर तब्बल सात वर्षांनी शिवसेनेची एवढी मोठी सभा कुडाळमध्ये होणार आहे. त्यामुळे उद्धव यांच्या आजच्या सभेकडं सर्वांच लक्ष लागलंय.

First Published: Sunday, April 28, 2013 - 11:26
comments powered by Disqus