जैतापूर प्रकल्पाला विरोधच- उद्धव ठाकरे

काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं शक्ती प्रदर्शन घडलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 28, 2013, 08:07 PM IST

www.24taas.com, कुडाळ
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं शक्ती प्रदर्शन घडलं. या सभेत राणेंचं वस्त्रहरण न करता जैतापूरला मात्र उद्धव ठाकरेंनी जोरदार विरोध केला. पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे-

कुडाळमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा|
उद्धव ठाकरेंच्या सभेला कोकणवासीयांची प्रचंड गर्दी|
शिवसेना कुणीही संपवू शकत नाही- उद्धव ठाकरे|
मध्ये येणाऱ्यांचे डोळे पांढरे होतील- उद्धव ठाकरे|
शिवसेनाप्रमुखांनी अनेकांना मोठं केलं- उद्धव ठाकरे|
सगळेच गद्दार नसतात- उद्धव ठाकरे|
आपल्या माणसांवर नाराज नाही- उद्धव ठाकरे|
राणेंचं वस्त्रहरण करण्यासाठी ही सभा नाही- उद्धव ठाकरे|
वस्त्रहरण करण्यासाठी तुम्ही समर्थ- उद्धव ठाकरे|
विकासाची स्वप्नं दाखवून तुंबडी भरता का?- उद्धव ठाकरे|
विमानतळासाठी संपादित जमिनींचं काय झालं?- उद्धव ठाकरे|
अनेक प्रकल्प अपूर्ण का?- उद्धव ठाकरे|
कोकणवासियांची सटकली तर काही खरं नाही... दादागिरी करणाऱ्यांना सटकवणार - उद्धव ठाकरे
उत्तरं देणारे आमदार- खासदार आहेत कुठे?- उद्धव ठाकरे|
बेलगाम अजित पवारांना आवरा- उद्धव ठाकरे|
धरणग्रस्तांची फक्त फसवणूक झाली- उद्धव ठाकरे|
आर.आर. पाटील गृहखातं संभाळण्यात अपयशी- उद्धव ठाकरे|
अजित पवारांचं आत्मक्लेश म्हणजे नाटक- उद्धव ठाकरे|
हिंमत असेल तर दुष्काळग्रस्त भागात जा- उद्धव ठाकरे|
राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडा शिकवा- उद्धव ठाकरे|
पृथ्वीराज चव्हाणांकडून बऱ्याच अपेक्षा- उद्धव ठाकरे |
गरीबांना उखाडण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून- उद्धव ठाकरे|
चौकशीचा फार्स कशासाठी?- उद्धव ठाकरे |
असली लोकशाही काय कामाची?- उद्धव ठाकरे|
अणुभट्टी म्हणजे हातभट्टी आहे का??- उद्धव ठाकरे|
जगाने नाकारलेलं धोकादायक तंत्र आपल्याकडे कशासाठी?- उद्धव ठाकरे|
जैतापूरमुळे लोडशेडिंग कमी होणार आहे का?- उद्धव ठाकरे|
जैतापूर इतर राज्यांत नेऊन दाखवा- उद्धव ठाकरे|
कोकणच्या मुळावर येणाऱ्यांना उखडून टाका- उद्धव ठाकरे|
दिल्लीत झुकणारे नेते राज्याला नको- उद्धव ठाकरे|
कोकणच्या विकासाला बळ द्या- उद्धव ठाकरे|