श्रीमंत होण्यासाठी करा हा उपाय...

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, May 26, 2013 - 18:58

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
श्रीमंत होण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. पण बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही मनासारखा पैसा मिळत नाही. त्यासाठी मेहनत करुनही त्याच्या मोबदल्यात योग्य पैसे न मिळणं, ही अनेकांची समस्या असते.
काही जणांना अशावेळी आपल्या नशिबातच पैसा नाही, असं वाटू लागतं. आवक वाढली की अचानक मोठे खर्च उद्भवतात. त्यामुळे हातात आलेले पैसे निघून जातात. श्रीमंती उपभेगता येत नाही. यावर उपाय आहे.
सकाळी आन्हिक उरकल्यानंतर कणकेच्या १०८ लहान लहान गोळ्या बनवा. या गोळ्या बनवताना ‘ऊँ लक्ष्मी लक्ष्माये नम:’ हा मंत्र म्हणावा. गोळ्या करून झाल्यावर त्या एखाद्या तळ्यात किंवा विहिरीत माशांना खायला घालाव्यात. असं रोज केल्याने लवकरच तुम्हाला आर्थिक परिस्थितीत फरक जाणवेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.First Published: Sunday, May 26, 2013 - 18:58


comments powered by Disqus