अकलेचे तारे !-६ 
अभिनेता शाहरुख खाननं आपण असुरक्षित असल्याचं केलेलं वक्तव्य आणि त्यावर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी उधळलेली मुक्ताफळं यामुळं काही प्रश्न निर्माण झालेत. शाहरुख खानसारख्या अभिनेत्याला असुरक्षित का वाटतंय? अभिनेत्यांना राजकीय नेते वापरून घेत असल्याच्या शाहरुखच्या आरोपांत तथ्य आहे का? आणि पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना याप्रकरणी अकलेचे तारे का तोडावेसे वाटतात?