आबांचा सल्ला, वाद घालू नका 
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरेंचच नाव देण्यात येणार असून त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही तसंच आक्षेप असणा-या सर्वांशी बोलणी करून वाद मिटविण्याचे प्रयत्नही आम्ही करत असल्याची प्रतिक्रिया साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील तटकरेंनी दिली. त्याचवेळी कोणताही वाद घालू नका, असा सल्ला गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलाय.