बाळासाहेबांचे अंतिम दर्शन 
बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शनिवारी दुपारी ३.३३ वाजता अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या देशाच्या राजकारणात गेली पाच दशके घोंगावणारे वादळ शांत झाले. रविवारी अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव ठेवण्यात आला होता. यावेळी दिग्गज नेत्यांसह कलाकारांनी शेवटचे दर्शन घेतले.