सिंचन घोटाळ्याची SIT चौकशी होणार

सिंचन घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीला सरकार अखेर तयार झालय. जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापण्यात येणारय. जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली.

प्रशांत जाधव | Updated: Dec 17, 2012, 05:09 PM IST

www.24taas.com, नागपूर
सिंचन घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीला सरकार अखेर तयार झालय. जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापण्यात येणारय. जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली.
विरोधकांच्या मागणीपुढं सरकार झुकल्याचं चित्र आहे. तर चौकशीच्या घोषणेनंतर भाजपनं समाधान व्यक्त केलय. मात्र ज्या मंत्र्यांची एसआयटी चौकशी होणार त्यांची खाती काढून त्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून ठेवावे अशी मागणी भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केली.
त्यामुळं भाजपचा रोख सुनील तटकरे यांचे खाते काढून घेण्याकडे असल्याचं पुढं आलंय. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी सरकारनं मान्य केल्यानं विधिमंडळ अधिवेशनाचं कामकाज सुरळीत होण्याचा मार्ग मात्र मोकळा झालाय.