या आमदारांनी केली पोलिसांना मारहाण

आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. कुठकुठल्या आमदारांनी केली पोलिसांना मारहाण?

जयवंत पाटील | Updated: Mar 19, 2013, 05:05 PM IST

www.24taas.com, मुंबई
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यामुळे यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
आमदार क्षितिज ठाकूर यांनी विधान परिसर आवारात एका पोलिसाला मारहाण केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे कमालीचे संतप्त झालेत.

पोलिसांना मारहाण करणाऱ्या आमदारांची यादी

राम कदम (मनसे)
वीरेंद्र जगताप (काँग्रेस)
जयकुमार रावल (भाजप)
क्षितीज ठाकुर (बहुजन विकास आघाडी)
प्रदीप जयस्वाल (अपक्ष)
राजन साळवी(शिवसेना)