थायरॉईडची लक्षणं आणि उपाय!

पुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण-तणावांचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो. धावपळीची जिवनशैली आत्मसात करणाऱ्या महिलांमध्ये थायरॉईड ही जणू काय सर्वसामान्य गोष्ट बनलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 6, 2013, 02:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण-तणावांचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो. धावपळीची जिवनशैली आत्मसात करणाऱ्या महिलांमध्ये थायरॉईड ही जणू काय सर्वसामान्य गोष्ट बनलीय. थायरॉईडच्या १०० रुग्णांमध्ये ८० रुग्ण या महिला असतात, असं एका अध्ययनातून समोर आलंय.
थायरॉईड तीन प्रकारचे असतात परंतु यामध्ये सर्वात आघाडीवर आहे तो म्हणजे ‘हायपोथारयाइडिज्म’. रक्ताची चाचणी झाल्यानंतरच या प्रकारच्या थायरॉईडच्या लक्षणांचे संकेत मिळतात.
आपल्या गळ्याच्या समोरच्या भागात ज्या ग्रंथि असतात त्यांना थायरॉर्ईड म्हटलं जातं. यातून एक प्रकारचे हार्मोन्स निघतात ज्यांना थायरॉईड हार्मोन म्हटलं जातं. या हार्मोनमुळे आपल्या शरीराच्या अवयवांच्या क्रिया नियंत्रित होतात.
जेव्हा तुम्ही थोडं जास्त काम केलं तरी तुम्हाला थकावटीची जाणीव होते किंवा तुमचं वजन अचानक वाढायला लागतं किंवा शरीराच्या विविध भागांत मंद-मंद दुखायला लागतं किंवा त्वचा आणि केसांमध्ये कडकपणा जाणवायला लागतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे नेहमी ताण-तणावात दिसू लागता तर समजून जा की तुम्हालाही हायपोथायराइडिज्मची समस्या आहे.
यावर उपाय म्हणजे, कॅफीन आणि शर्करेचं प्रमाण एकदम कमी करा. याशिवाय, शरीरात शर्करेचं प्रमाण वाढवणाऱ्या इतर पदार्थांचं प्रमाणही कमी करा. खाण्यात प्रोटीनचं प्रमाण वाढवा. शरीरात प्रोटीनच थायरॉईड हार्मोन्सला ढकलून टिश्यूजपर्यंत पोहचवतात. खाण्यात प्रोटीनचं प्रमाण वाढवल्यानं थायरॉईडची कार्यप्रमाण सामान्य केली जाऊ शकते. या आजारात वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.

वजन कमी करण्याच्या नादात अनेकदा रुग्ण फॅट सोडून देतात यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडलं जातं. अशा वेळी शरीराची गरज पूर्ण करणारे फॅट घेणं गरजेचं असतं. हो पण हे फॅट हेल्दी असतील याची जरुर काळजी घ्या. थायरॉइडची अनेक लक्षणं पोषक पदार्थांच्या सेवनानं दूर होऊ शकतात. या आजारात महिलांमध्ये विशेषत: आयर्नची कमतरता भासते. अशा वेळी त्यांना आयर्नसोबतच इतर पोषक पदार्थही मोठ्या प्रमाणात घ्यायला हवेत. स्वस्थ राहण्यासाठी संतुलित भोजन जरूर करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.