तोंडातील विषाणूही सांगतात तुमची वांशिक ओळख

मनुष्याच्या तोंडातील खासकरून हिरड्यांखाली असणारे विषाणू मानवी बोटाच्या ठशाप्रमाणेच प्रभावी असतात. या विषाणूंच्या साहाय्यानंही मनुष्याची ओळख पटवली जाऊ शकते, असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 31, 2013, 04:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
मनुष्याच्या तोंडातील खासकरून हिरड्यांखाली असणारे विषाणू मानवी बोटाच्या ठशाप्रमाणेच प्रभावी असतात. या विषाणूंच्या साहाय्यानंही मनुष्याची ओळख पटवली जाऊ शकते, असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आलंय. हा शोध ‘प्लोस वन जर्नल’च्या नव्या अंकात प्रकाशित करण्यात आलाय.
‘ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी’च्या शास्त्रज्ञांनी चिनी, लॅटीन, श्वेतवर्णीय आणि गैर-हिस्पेनिक अश्वेतो (काळ्या) या चार जातीच्या १०० सहभागींच्या तोंडातील जवळजवळ ४०० विभिन्न जीवाणूंच्या प्रजातींचं अध्ययन केलं. संशोधकांनी यामध्ये सहभागींच्या दाताचा पृष्ठभाग, लाळ आणि हिरड्यांच्या खालच्या भागातील विषाणूंचे नमुने घेतले.
मानवाच्या काही जातींपैकी खासकरून आफ्रिकन, अमेरिकन आणि लॅटीन लोकं हिरड्यांच्या आजारांसाठी अधिक संवेदनशील का असतात किंवा नाही? याचा अभ्यास संशोधकांनी या अध्ययनातून करण्याचा प्रयत्न केला.
हिरड्यांच्या खाली आढळणारे विषाणू मानवाच्या ‘एथनिक आयडेन्टीटी’ म्हणजेच वांशिक ओळख पटवून देऊ शकतात, असं या अध्ययनात समोर आलंय. परंतु, विषाणूंचं अन्न, टूथपेस्ट आणि तंबाखूसारख्या कारणांचा परिणाम विषाणुंवरही होऊन त्याची तीव्रता कमी-जास्त होऊ शकते, असं कुमार यांनी म्हटलंय. या अभ्यासाच्या निमित्तानं मानवाची वांशिक ओळख करून देणारे विषाणू मनुष्याच्या तोंडातही अस्तित्वात असतात, असं समोर आलंय.
‘ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी’च्या सह-प्राध्यापक आणि संबंधित संशोधनाच्या वरिष्ठ लेखिका पूर्णिमा कुमार यांच्या म्हणण्यानुसार, मनुष्याच्या तोंडात विषाणू जीवंत राहू शकतात की नाही हे त्यांच्या भोजनाच्या आणि स्वच्छतेच्या सवयी निर्धारित करत असतात. यासाठी दंत वैद्य आपल्याला दात ब्रश करायला आणि स्वच्छ करण्यास सांगतात.

‘ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी’च्या सह-प्राध्यापक आणि संबंधित संशोधनाच्या वरिष्ठ लेखिका पूर्णिमा कुमार यांच्या म्हणण्यानुसार, मनुष्याच्या तोंडात विषाणू जीवंत राहू शकतात की नाही हे त्यांच्या भोजनाच्या आणि स्वच्छतेच्या सवयी निर्धारित करत असतात. यासाठी दंत वैद्य आपल्याला दात ब्रश करायला आणि स्वच्छ करण्यास सांगतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.