गर्भवतीचं अधिक वजन बाळाचा वाढवतो लठ्ठपणा!

गर्भवती महिलेचं वजन जितकं जास्त वाढेल त्याचा परिणाम बाळाच्या लठ्ठपणाशी संबंधित असतो, असा निष्कर्ष एका अभ्यासात पुढं आलाय. अमेरिकेतील नियतकालिक पीएलओएसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार “गर्भावस्था आपल्या पुढच्या पिढीला लठ्ठपणापासून वाचविण्याचा एक महत्त्वपूर्ण काळ आहे”.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 3, 2013, 09:52 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
गर्भवती महिलेचं वजन जितकं जास्त वाढेल त्याचा परिणाम बाळाच्या लठ्ठपणाशी संबंधित असतो, असा निष्कर्ष एका अभ्यासात पुढं आलाय. अमेरिकेतील नियतकालिक पीएलओएसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार “गर्भावस्था आपल्या पुढच्या पिढीला लठ्ठपणापासून वाचविण्याचा एक महत्त्वपूर्ण काळ आहे”.
बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलमधील संशोधकांनी दोन किंवा अधिक मुलांना जन्म दिलेल्या तब्बल ४१ हजार १३३ मातांची तपासणी केली आणि मुलांमधलं बालपणीचा लठ्ठपणा हा त्यांच्या मातांच्या गर्भावस्थेतील स्थिती, त्यांचा आहार आणि त्यांच्यातले जीन्स यावर अवलंबून असतो.
संशोधकांनी दोन किंवा अधिक मुलांना जन्म दिलेल्या मातांचा जन्म देण्याचा रेकॉर्ड आणि त्यांच्या मुलांच्या वयाच्या बॉडी मास इंडेक्सला (बीएमआई) जोडून बघितलं. नंतर त्या मुलांच्या त्यांच्याच भावंडाबरोबर तुलना करण्यात आली. त्यात हे लक्षात आलं की, या भावंडामध्ये लठ्ठपणाचे जीन्स एकसारखे दिसून आले. यात घरगुती वातावरण, सामाजिक-आर्थिक परिस्थिती यांचाही प्रभाव पडतो, असं या अभ्यासकर्त्यांचं म्हणणं आहे.
आईचं गर्भावस्थेत वाढलेलं १ किलो वजन म्हणजे १२ वर्षीय मुलाच्या शरीरात मास इंडेक्स (BMI) ० ते ०.२ किलोग्रामपर्यंत वजन वाढवतं.
बोस्टनमधील एका चिल्ड्रन हॉस्पिटलच्या न्यू बॅलेंस फाऊंडेशन ओबेसिटी प्रिव्हेंशन सेंटरचे संचालक आणि लेखक असलेल्या डेव्हिड ल्यूडविग यांनी सांगितलं की, गर्भावस्थेदरम्यान अति वजन वाढल्यानं स्थूलपणाचा आजार पसरण्याची शक्यता खूप जास्त असते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.