भारतातील ४ पैकी ३ कामकाजी महिलांना आरोग्य समस्या

महिला एकाचवेळी अनेक कामं करतात.. त्या घर सांभाळतात सोबतच ऑफिसही... मात्र त्याचवेळेस त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. नुकताच असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (ASSOCHAM) यांनी केलेल्या सर्व्हेनुसार देशातील कामकाजी महिलांमधील प्रत्येकी ४ पैकी ३ महिलांना आरोग्याच्या समस्या आहेत.

Aparna Deshpande | Updated: Mar 11, 2014, 11:01 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
महिला एकाचवेळी अनेक कामं करतात.. त्या घर सांभाळतात सोबतच ऑफिसही... मात्र त्याचवेळेस त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. नुकताच असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (ASSOCHAM) यांनी केलेल्या सर्व्हेनुसार देशातील कामकाजी महिलांमधील प्रत्येकी ४ पैकी ३ महिलांना आरोग्याच्या समस्या आहेत.
सर्व्हेनुसार मल्टिटास्किंग करत कार्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या ७८ टक्के महिलांना विविध आरोग्य समस्या आहेत. त्यात ३२-५८ या वयोगटातील महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे.
संस्थेनं केलेल्या अभ्यासानुसार नोकरी करणाऱ्या या महिला आपल्या लाईफस्टाईलमुळं लठ्ठपणा, नैराश्य, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयाचे आजार, मूत्रपिंड रोग इत्यादीसोबत झगडतात.
सर्व्हेनुसार ४२ टक्के कामकाजी महिला लाईफस्टाईल आजार म्हणजेच उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, नैराश्य, पाठदुखी, हृदय विकार आणि २२ टक्के महिला विविध आजारांनी त्रस्त आहेत.
चेंबरनं आपला हा अभ्यास बंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि मुंबई यासारख्या मेट्रो शहरांमध्ये केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.