व्हिटॅमिन ‘बी’मुळं हृदयविकाराचा धोका कमी!

हृदयविकार आणि व्हिटॅमिन ‘बी’मधला संबंध संशोकांनी शोधून काढलाय. व्हिटॅमिन ‘बी’मुळं हृदयविकाराचा धोका कमी होतो, असा निष्कर्ष संशोधकांनी लावलाय. न्यूरॉलॉजीच्या अमेरिका अॅकॅडमीतील मेडिकल जर्नलमध्ये हे मांडण्यात आलंय.

Aparna Deshpande | Updated: Sep 24, 2013, 09:57 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, बीजिंग
हृदयविकार आणि व्हिटॅमिन ‘बी’मधला संबंध संशोकांनी शोधून काढलाय. व्हिटॅमिन ‘बी’मुळं हृदयविकाराचा धोका कमी होतो, असा निष्कर्ष संशोधकांनी लावलाय. न्यूरॉलॉजीच्या अमेरिका अॅकॅडमीतील मेडिकल जर्नलमध्ये हे मांडण्यात आलंय.

चीनच्या झेंग्झाऊ विद्यालयाचे प्राध्यापक सू यूमिंग यांनी व्हिटॅमिन ‘बी’ आणि हृदयविकार पूरक असा हा निष्कर्ष काढला आहे. संशोधकांनी केलेल्या वेगवेगळ्या १४ चाचण्यांमध्ये ५४,९१३ सहभागी लोकांचं विश्लेषण केलं. यात या लोकांच्या आहारातील व्हिटॅमिन ‘बी’चं प्रमाण किती आहे याचाही अभ्यास केला गेला.
मग या सहभागी लोकांचं पुढील सहा महिने निरीक्षण केलं गेलं. सायंस डेलीच्या एका रिपोर्टनुसार अभ्यासात एकूण २,४७१ हृदयविकार असलेले लोक बघितले गेले. त्यांना नंतर व्हिटॅमिन ‘बी’ घेतल्यानं खूप फायदा झाल्याचं निदर्शनास आलं. एकूणच झालेल्या अभ्यासातून व्हिटॅमिन ‘बी’ हृदयविकाराचा धोका सात टक्क्यानं कमी करतो असा निष्कर्ष काढण्यात आला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.