वजन कमी करण्याचा घरगुती उपाय- काकडी!

उन्हाळा सुरू झालाय आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते, ती भरून काढण्याचं काम काकडी करू शकते. सोबतच काकडीच्या ज्यूसमध्ये असे काही पोषक तत्त्वे आहेत की ज्यामुळं बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीची समस्या दूर होऊ शकते.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 5, 2014, 05:49 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
उन्हाळा सुरू झालाय आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते, ती भरून काढण्याचं काम काकडी करू शकते. सोबतच काकडीच्या ज्यूसमध्ये असे काही पोषक तत्त्वे आहेत की ज्यामुळं बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीची समस्या दूर होऊ शकते.
पचनक्रिया मजबूत करण्यासोबत काकडी गॅस्ट्रिक आणि छोट्या आतडीचा अल्सर झालेल्या रुग्णांसाठी औषध म्हणून काम करते. काकडीमध्ये ९६ टक्के पाणी असतं, जे की कोणत्याही कंपनीच्या बंद बाटलीच्या पाण्यापेक्षा चांगलं आणि शुद्ध असतं.
काकडीमध्ये अल्कालिन फॉमिंग मिनरल्स (क्षार) असतात, म्हणूनच त्याचा वापर ब्युटी प्रॉडक्ट्समध्येही प्रयोग केला जातो. यात अँटीऑक्सिडंटचं काम करणारे व्हिटॅमिन ए, सी,मॅँगनिज, पोटॅशियम, सिलिका आणि सल्फर असतात.
काकडी खूप कमी कॅलरी असणारं पदार्थ आहे. १०० ग्राम काकडीमध्ये ५४ कॅलरी ऊर्जा असते. म्हणूनच काकडी खाल्ल्यानं वजन वाढत नाही. काकडी ब्लड प्रेशरलाही कमी करते, मात्र ब्लड प्रेशरचा त्रास असणारे रुग्ण काकडीला मीठ लावून खाऊ नये. काकडी शरीरातील विषारी पदार्थ यूरिनच्या माध्यमातून शरीराबाहेर काढते.
ताप आल्यास काकडीचा ज्यूस प्यावा. त्यामुळं शरीराचं तापमान नियंत्रणात राखतं. जर अपचनाचा त्रास होत असेल तर जेवणासोबत सलाद म्हणून काकडी खावी. काकडी गोल कापून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची जळजळ कमी होते. दररोज सलाद म्हणून काळं मीठ, कालीमिर्च आणि लिंबू पिळून काकडी खावी. काकडीची कोशिंबिरही बनवून आपण खावू शकता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.