मार्क झुकरबर्गचं 'Status' झालं 'Married'

Last Updated: Sunday, May 20, 2012 - 15:44

www.24taas.com, न्यूयॉर्क

 

तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ऑर्कूट सोशल नेटवर्किंग वेबसाईटला आव्हान देत फेसबुकची निर्मिती करणारा मार्क झुकरबर्ग लग्नाच्या बेडीत अडकला आहे. कॅलिफोर्नियाच्या प्रिसिला चॅनशी झुकरबर्ग विवाहबद्ध झाला आहे.

 

मार्क प्रिसिला शिक्षिका आहे. कॅलिफोर्नियातल्या सेन जोन्समध्ये ती शिक्षिका म्हणून काम करते. फेसबुकसारखी अफलातून सोशल नेटवर्किंग वेबसाईट स्थापन करत जगभरातल्या तरुणाईला तर त्याने वेड लावलेच आहे. त्याचबरोबर आबालवृद्धही तितकेच फेसबुकच्या प्रेमात पडले आहेत.

 

फेसबुकला मिळालेल्या अफाट लोकप्रियतेमुळे झुकरबर्ग जगभरातल्या तरुणींसाठी दि मोस्ट इलिजिएबल बॅचलर ठरला होता. नुकत्याच फेसबुकने काढलेल्या आयपीओलाही सुरुवातीलाच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. झुकेरबर्ग आणि प्रिसिलाच्या या शानदार लग्नसोहळ्याला मोजकीच मंडळी उपस्थित होती.

 

 

 

 

First Published: Sunday, May 20, 2012 - 15:44
comments powered by Disqus