खुशखबर ! देशभरात १२ लाख नोकरीच्या संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या डिजीटल इंडिया आणि मेक इन इंडिया या दोन योजनांचा फायदा भारतातील युवा पिढींना होणार आहे अशी माहिती नोकरी विषयक माहिती सांगणाऱ्या एका वेबसाईटने दिली आहे.

Updated: Jan 14, 2016, 07:29 PM IST
खुशखबर ! देशभरात १२ लाख नोकरीच्या संधी title=
jobs, job opportunity

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या डिजीटल इंडिया आणि मेक इन इंडिया या दोन योजनांचा फायदा भारतातील युवा पिढींना होणार आहे अशी माहिती नोकरी विषयक माहिती सांगणाऱ्या एका वेबसाईटने दिली आहे.

देशात या वर्षात जवळपास १२ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचा दावा या वेबसाईटने केला आहे.

खाजगी कंपनीत नोकरीची संधी :

खाजगी कंपन्यांच्या नोकरीमध्ये ४५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. तर पगार वाढ ही मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सरकारी नोकरी : 

२०१६ या वर्षात भारतीय रेल्वेमध्ये १८,००० नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. याव्यतिरीक्त इतर सरकारी खात्यांमध्येही नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती या वेबसाईटने दिली आहे.