तब्बल ३२ मिलियन ट्विटर अकाऊंट हॅक

फेसबूकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचे ट्विटर अकाऊन्ट काही दिवसांपूर्वी हॅक झाले होते. काही दिवस होत नाही तेवढ्यात एक दुसरी मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल ३२ मिलियन ट्विटर पासवर्ड हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. ३,२८,८८,३०० ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा दावा लिकडसोर्स या वेबसाईटने केला आहे. पण ट्विटरने आमच्याकडून अकाऊंट हॅक न झाल्याचा दावा केलाय.

Updated: Jun 9, 2016, 05:00 PM IST
तब्बल ३२ मिलियन ट्विटर अकाऊंट हॅक title=

मुंबई : फेसबूकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचे ट्विटर अकाऊन्ट काही दिवसांपूर्वी हॅक झाले होते. काही दिवस होत नाही तेवढ्यात एक दुसरी मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल ३२ मिलियन ट्विटर पासवर्ड हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. ३,२८,८८,३०० ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा दावा लिकडसोर्स या वेबसाईटने केला आहे. पण ट्विटरने आमच्याकडून अकाऊंट हॅक न झाल्याचा दावा केलाय.

कशी घ्याल काळजी

तुमच्या अकाऊंटवर कोणतीही लिंक आली तर त्याला ओपन करु नका. त्यामुळे तुमची माहिती लिक होऊ शकते. फ्री ऑफर असणाऱ्या लिंकपासून सावधान राहा. कोणतीही माहिती कुठेही विचारली तर भरु नको.