प्रपोज डे स्पेशल : प्रपोज करण्यापूर्वी ४ महत्त्वाच्या टीप्स

आज प्रपोज डे आहे. प्रपोज डे म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता ते व्यक्त करण्याचा दिवस. जर तुम्ही तुमच्या हृद्यातील भावना व्यक्त करण्याचा विचार करताय तर मग असं करतांना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे तुम्हाला सांगणार आहोत.

Updated: Feb 8, 2017, 02:40 PM IST
प्रपोज डे स्पेशल : प्रपोज करण्यापूर्वी ४ महत्त्वाच्या टीप्स title=

मुंबई : आज प्रपोज डे आहे. प्रपोज डे म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता ते व्यक्त करण्याचा दिवस. जर तुम्ही तुमच्या हृद्यातील भावना व्यक्त करण्याचा विचार करताय तर मग असं करतांना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे तुम्हाला सांगणार आहोत.

१. सर्वात आधी तर ही गोष्ट लक्षात ठेवा की, मुलीला प्रपोज करणे हे एका दिवसाचं काम नसतं. तुम्हाला तुमची भावना सांगण्याआधी तिच्या हृद्यात तुमची जागा मिळवावी लागेल. त्या व्यक्तीच्या हृद्यात जागा मिळवण्यासाठी त्या व्यक्तीची केअरींग करा. तिला असं वाटलं पाहिजे की तुम्ही पहिला व्यक्ती आहात जे त्यांच्या मदतीसाठी धावून याल.

२. प्रपोज करण्यासाठी खास जागेची निवड करा. अशी जागा जेथे तुम्ही दोघेच असाल आणि ती जागा तुमच्या दोघांच्या हृद्याच्या जवळ असेल. जास्त गर्दीचं स्थान निवडू नका. त्या व्यक्तीच्या आवडत्या हॉटेलमध्ये किंवा अन्य ठिकाणी जा.

३. प्रपोज करण्याची प्रयत्न हा खास असला पाहिजे. प्रत्येक मुलीचे काही स्वप्न असतात. तुम्ही अंगठी घालून प्रपोज करा. जर तुम्हाला प्रपोज करण्यासाठी भीती वाटत असेल तर मग पत्र लिहा. पत्रात तेच नाव लिहा ज्या नावाने तुम्ही तिला हाक मारता.

४. महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी त्या कपड्यांमध्ये जा जे त्या व्यक्तीला आवडतात. आजच्या दिवशी नीट नेटकं तयार होऊन जा.