साडेचार सेकंदात या फोनचा दुसरा स्टॉकही विकला गेला

भारतात शाओमी फोनचं वेड वाढत जातंय. भारतात कंपनीने याआधीच मी ३ ची काही सेंकदात ऑनलाईन यशस्वी विक्री केली आहे. शाओमी रेडमी 1S  या फोनचा दुसरा स्टॉक ४.५ सेकंदात ऑनलाईन विकला गेला आहे. याची माहिती कंपनीने ट्ववीट द्वारे दिली आहे. ५ हजार ९९९ रूपयात शाओमीची पहिला स्टॉक 4.2 सेकंदात विकला गेला होता. भारतात आतापर्यंत ८० हजार शाओमी रेडमी वन-एस फोन विकले गेले आहेत.

Updated: Sep 9, 2014, 06:01 PM IST
साडेचार सेकंदात या फोनचा दुसरा स्टॉकही विकला गेला title=

मुंबई  : भारतात शाओमी फोनचं वेड वाढत जातंय. भारतात कंपनीने याआधीच मी ३ ची काही सेंकदात ऑनलाईन यशस्वी विक्री केली आहे. शाओमी रेडमी 1S  या फोनचा दुसरा स्टॉक ४.५ सेकंदात ऑनलाईन विकला गेला आहे. याची माहिती कंपनीने ट्ववीट द्वारे दिली आहे. ५ हजार ९९९ रूपयात शाओमीची पहिला स्टॉक 4.2 सेकंदात विकला गेला होता. भारतात आतापर्यंत ८० हजार शाओमी रेडमी वन-एस फोन विकले गेले आहेत.

ऑनलाईन खरेदीसाठी काही अटी
शाओमी रेडमी 1S खरेदी करण्यासाठी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. आता याची पुढील स्टॉकची विक्री १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. ज्या लोकांनी या आधी रजिस्ट्रेशन केलं आहे आणि ते फोन खरेदी करू शकलेले नाहीत, त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.