पार्टनरला इंम्प्रेस करण्यासाठी ५ गोष्टी

पार्टनरच्या सतत आठवणीत राहण्यासाठी तिला काही तरी सरप्राईज दिलं पाहिजे. ज्यामुळे तुम्ही पार्टनरच्या सतत आठवणीत राहाल. तुम्ही पार्टनरला इंम्प्रेस केलं तर तुम्ही सतत आठवणीत राहता.

Updated: Feb 3, 2016, 06:04 PM IST
पार्टनरला इंम्प्रेस करण्यासाठी ५ गोष्टी title=

मुंबई : पार्टनरच्या सतत आठवणीत राहण्यासाठी तिला काही तरी सरप्राईज दिलं पाहिजे. ज्यामुळे तुम्ही पार्टनरच्या सतत आठवणीत राहाल. तुम्ही पार्टनरला इंम्प्रेस केलं तर तुम्ही सतत आठवणीत राहता.

लव्ह लेटर : तुम्ही जर तुमच्या जोडीदाराला लव्ह लेटर लिहून दिलं तर त्यामुळे ती आणखी इम्प्रेस होऊ शकते. हे लव्ह लेटर तुम्ही स्वत: किंवा जोडीदाराच्या आवडत्या वस्तूजवळ किंवा एखाद्या गिफ्टसह दिलं तर तुमची आयडियावर ती इंम्प्रेस होऊ शकते.

मॅसेज : 'आय लव्ह यू'चा एक छोटासा मॅसेजही तिच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतो. तसेच तुम्ही तिच्या आठवणीत त्यामुळे राहू शकता. काही जोक्स, किंवा जोडीदारावर एखादी कविता केली तर उत्तम.  

फोटो : तुमच्या जोडीदाराचा तुमच्या आवडता ड्रेसवरचा फोटो तुम्ही जोडीदाराला पाठवू शकता. व्हॉट्सअॅप किंवा फेसबूकवर पार्टनरसोबत फोटो शेअर केला तर जोडीदारा इंम्प्रेस होणारच.

सरप्राईज : गिफ्ट आणि सरप्राईज फक्त मुलींनाच आनंदी करत नाही तर मुलांनाही खूप आवडते. एखादं सरप्राईज हे सारखं लक्षात येतं. ज्यामुळे तुम्ही जोडीदाराच्या सतत आठवणीत राहता.

परफ्यूम : तुम्ही जो परफ्यूम वापरता तो परफ्यूम तुम्ही जोडीदाराला गिफ्ट करा. जेव्हा तिला तो सुंगध येईल तेव्हा तिला तुमची आठवण होईल.