नवीन वर्षात ८.५ लाख <b><font color=red>नोकरींची संधी </font></b>

तरुणांसाठी गुडन्यूज. नविन वर्षात नोकरीची संधी युवकांना चालून येणार आहे. विविध क्षेत्रात सुमारे ८ लाख ५० हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नविन वर्षात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगले लाभदायक आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 26, 2013, 05:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तरुणांसाठी गुडन्यूज. नविन वर्षात नोकरीची संधी युवकांना चालून येणार आहे. विविध क्षेत्रात सुमारे ८ लाख ५० हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नविन वर्षात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगले लाभदायक आहे.

एका सर्व्हेक्षणामध्ये ही बाब पुढे आली आहे. २०१४ या नविन वर्षात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. सर्वच क्षेत्रात काम मिळण्याची शक्यता अधिक आहे. बॅंक, मॉल, आरोग्य विभाग, उत्पादन क्षेत्र, मीडियामध्ये नोकरीची संधी चालून येणार आहे. त्यामुळे नविन वर्षात कमीत कमी ८ लाख ५० हजार लोकांना नोकरी मिळू शकते, असे एका पाहणीत आढळून आले आहे.

२०१४मध्ये भारतीय अर्थव्यवस्था चांगली असेल. त्यामुळे नोकरीची संधी अधिक आहे. यावर्षी जवळपास ७.९ लाख जणांना नोकरीची संधी मिळाली. २०१३पेक्षा येणारे २०१४ हे वर्ष या वर्षापेक्षा नोकरीसाठी चांगले असणार आहे.

रिक्रूटमेंटबाबत अभ्यास करणाऱ्या एका कंपनीने ही माहिती दिली आहे. कंपनीने जवळपास ५,६०० कंपन्यांचा अभ्यास केला तसेच पाहणी करून हा निष्कर्ष काढला आहे. कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये १२ उदयोगांमध्ये नोकरीची संधी आहे. त्यानुसार हेल्थकेयर, आईटी, रिटेल आणि रूग्णालय आदींमध्ये कामा करण्यासाठी मनुष्यबळ लागेल. त्यामुळे नोकर भरती करावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे.
या सर्व्हेक्षणानुसार एफएमसीजी सेक्टरमध्ये १.५ लाख लोकांना नोकरी मिळू शकते. त्यानंतर हेल्थ केअर सेक्टरमध्ये १.३३ लाख, आयटी सेक्टर १.२१ लाख, रिटेल सेक्टर ८६७०० आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये ८३,४०० नोकऱ्या आहेत. बँकिंग सेक्टरने यावर्षी खूप नोकऱ्या दिल्या. या क्षेत्राकडून अधिक आशा आहेत. पुढील वर्षी बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये ६१४०० नोकरी संधी आहेत. मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनिअरिंगमध्ये ५१५०० आणि मीडिया आणि एंटरटेन्मेंट क्षेत्रात ४२,८०० नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. रिअल एस्टेटमध्ये ३८,७०० नोकऱ्या मिळू शकतात.
२०१३ या वर्षात भरती प्रक्रिया खूप कमी प्रमाणात झाली. २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणात भरती होईल अशी आशा आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.