कधी होणार तुमचा मृत्यू? या सुपर कम्प्युटरला ठाऊक आहे

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कधी होणार हे एक सुपर कम्प्युटर सांगू शकतो... असं तुम्हाला सांगितलं तर... तुमचा विश्वास बसणार नाही ना... पण, यूएसमध्ये मात्र असा एक सुपर कम्प्युटर तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. 

Updated: Sep 17, 2015, 10:38 PM IST
कधी होणार तुमचा मृत्यू? या सुपर कम्प्युटरला ठाऊक आहे title=
फोटो सौ. द मिरर

न्यूयॉर्क : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कधी होणार हे एक सुपर कम्प्युटर सांगू शकतो... असं तुम्हाला सांगितलं तर... तुमचा विश्वास बसणार नाही ना... पण, यूएसमध्ये मात्र असा एक सुपर कम्प्युटर तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. 

'द मिरर'नं दिलेल्या बातमीनुसार हा सुपर कम्प्युटर कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूबद्दल भविष्यवाणी करू शकतो... आणि ही भविष्यवाणी 100 टक्के खरीही ठरतेय. 

बॉस्टन स्थित बेथ इसराइल डीकोन्सेस मेडिकल सेंटरमध्ये इन्स्टॉल करण्यात आलेल्या सुपर कम्प्युटरमध्ये दीड लाखांहून जास्त लोकांबद्दल काही माहिती एकत्र करण्यात आलीय. तुमच्या आजारांशी साधर्म्य राखणाऱ्या रोग्यांशी याची तुलना केली जाते आणि भविष्यात तुमचा इलाज कसा होईल, याचीही माहिती दिली जाते. यामध्ये, पहिल्यांदाच 'बिग डाटा' सिद्धांताचा प्रयोग करण्यात आलाय. 

प्रत्येक तीन मिनिटांना हा सुपर कम्प्युटर रोग्यांचे आकडे कलेक्ट करतो. यामध्ये रोग्यांचा ऑक्सिजन लेव्हरपासून ते ब्लडप्रेशरपर्यंत सगळी माहिती असते. यामुळे रोग्याला योग्य उपचार देण्याची डॉक्टरांची क्षमता आणखीन अचूक होते. 

आणि याच आधारावर रोग्यांची मरण्याची सर्वाधिक शक्यता कधी आहे, याचा अचूक अंदाज आम्ही लावू शकतो, असं हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. स्टीव हार्ग यांनी म्हटलंय. 

जर कम्प्युटरनं तुम्ही मरणार असल्याचं सांगितलं तर पुढच्या तीस दिवसांत तुमचा मृत्यू होऊ शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.