`शैलभ्रमर`चं अॅडव्हान्चर्स फिल्म फेस्ट!

तुम्हाला जर अॅडव्हान्चर्स फिल्म पाहायची आवड असेल तर शैलभ्रमर या संस्थेनं तुमच्यासाठी एका फिल्म फेस्टिव्हिलचं आयोजन केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 28, 2013, 10:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुम्हाला जर अॅडव्हान्चर्स फिल्म पाहायची आवड असेल तर शैलभ्रमर या संस्थेनं तुमच्यासाठी एका फिल्म फेस्टिव्हिलचं आयोजन केलंय. एव्हरेस्ट मोहिमेवरील लघुपटाबरोबरच या चित्रपट महोत्सवात पनामा, धुमकेतू, मियार व्हॅली यांसारखे गिर्यारोहणावरील इतर लघुपटही पाहायला मिळणार आहेत.
`शैलभ्रमर` ही गिर्यारोहण क्षेत्रात्र कार्यरत असणारी संस्था यंदा पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करतेय. तरुणांमध्ये गिर्यारोहण या क्षेत्राचं आकर्षण निर्माण व्हावं, यासाठी या संस्थेनं गेली आठ वर्षे विनामूल्य फिल्मोत्सव आयोजित केलं आहे. विविध गिर्यारोहण संस्थांचे आरोहक करत असलेल्या मोहिमांचे वृत्तांकन आणि त्याचबरोबर संस्थांनी केलेल्या समाजपयोगी कार्याची दखल यांवरचे व्हिडिओज् जमवून ते लोकांसमोर आणण्याचं कामही या संस्थेनं केलंय.

हा फिल्मोत्सव उदया म्हणजेच 29 सप्टेंबर 2013 रोजी धुरू हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर (प) इथं दुपारी 3 ते 6 यावेळेत आयोजित करण्यात आलाय. महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.