नवी दिल्ली: एअरसेलच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता एअरसेलचे ग्राहक इंटरनेट सेवा मोफत मिळवू शकतात. कंपनीनं मोबाइल इंटरनेट वापरण्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही रणनिती वापरल्याचं कळतंय.
आणखी वाचा - आयफोन ग्राहकांसाठी 15,000 रुपयांचा मोफत 4 जी डाटा!
एअरसेलचे मुख्य मार्केटिंग अधिकारी अनुपम वासुदेव यांनी सांगितलं, 'आम्हाला वाटतं प्रत्येक व्यक्तीपर्यंत इंटरनेट पोहोचायला हवं. काही ठराविक लोकांपर्यंतच ते मर्यादित नको. आम्ही तामिळनाडूमध्ये मोफत इंटरनेट सेवा सुरू केलीय आणि एका वर्षात संपूर्ण देशात ही सेवा देण्यात येणार आहे.'
आणखी वाचा - 'एअरटेल 4G'च्या जाहिरातीवर बंदी घालण्याचे आदेश
कंपनीनं आपल्या 'फ्री बेसिक इंटरनेट प्रोग्राम' अंतर्गत 64 केबी प्रति सेकंदचा डाऊनलोड स्पीडसोबत ही सेवा दिलीय. एअरसेलचे उपाध्यक्ष (डाया, डिव्हाइस आणि ऑनलाइन) सुनील खुट्टम यांनी सांगितलं, 'नव्या ग्राहकांसाठी हे तीन महिने मोफत आणि यानंतर जर ते सक्रीय राहतील तर ते एका महिन्यात कमीत कमी 150 रुपयांचं रिचार्ज करावं लागेल.'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.