जिओला टक्कर, एअरटेल आणणार मोठी ऑफर

रियायंस जिओच्या मोठ्या यशानंतर आता इतर टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर आणल्या आहेत. जिओ १ एप्रिलपासून ३०३ रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड वॉईस कॉल आणि ३० जीबी डेटा देणार आहे. यानंतर एयरटेलने ही मोठी ऑफर आणली आहे.

Updated: Feb 28, 2017, 04:37 PM IST
जिओला टक्कर, एअरटेल आणणार मोठी ऑफर title=

मुंबई : रियायंस जिओच्या मोठ्या यशानंतर आता इतर टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर आणल्या आहेत. जिओ १ एप्रिलपासून ३०३ रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड वॉईस कॉल आणि ३० जीबी डेटा देणार आहे. यानंतर एयरटेलने ही मोठी ऑफर आणली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार एअरटेलने रोमिंग फ्री केल्यानंतर आत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा नवा प्लान आणला आहे. एअरटेल १४५ आणि ३४९ रुपयांच्या दोन ऑफर आणणार आहे.

१४५ रुपयांच्या प्लॅनमध्ये १४ जीबी 4G इंटरनेट आणि एअरटेल टू एअरटेल फ्री कॉलिंगची ऑफर देणार आहे. तर ३४९ च्या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. यामध्ये 500 एमबी प्रतिदिवस डेटा मिळणार आहे. पण कंपनीने अजून याची अधिकृत घोषणा केलेली नाही.