याबाबतीत अमिताभपेक्षाही पुढे आहेत मोदी

Updated: Dec 11, 2014, 09:59 AM IST
याबाबतीत अमिताभपेक्षाही पुढे आहेत मोदी title=

नवी  दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर कोणत्याही ट्विटला री-ट्विट करण्याच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात पुढे आहेत. मोदींच्या निवडणूक जिंकण्याच्या ट्विटला ७० हजार ५१५ लोकांनी शेअर केलं होतं, तसेच ट्विटवर फॉलोअर्सच्या बाबतीत सुपरस्टार महानायक अमिताभ बच्चन सर्वात आघाडीवर आहेत, बच्चन यांच्या फॉलोअर्सची संख्या १.१८ कोटी आहे.

भारतात सध्या इंडिय़ा हॅज वॉन-इच्छे दिन आने वाले है, हे सर्वात जास्त रिट्विट केलं जाणारं ट्विट आहे. रिट्विटच्या बाबतीत अभिनेता सलमान खान दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अभिनेता सलमान खान रिट्विटच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर आहे, सलमानने केलेल्या किक चित्रपटाच्या ट्रेलरला ५१ हजार ९८१ लोकांनी ट्विट केलंय. ट्विटरचे मार्केटिंग डायरेक्टर रिषी जेटली यांनी म्हटलंय, भारतात ट्विटरने अनेक लहान मोठ्या घटनांचं आकर्षण वाढवलं आहे.

टॉप दहा ट्विटमध्ये दक्षिण भारताचा अभिनेता रजनीकांतचं पहिलं ट्विट, इस्त्रोच्या मंगळ अभियानच्या बाबतीतलं ट्विंट तसेच सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर ह्युजला दिलेली श्रद्धांजलीचा समावेश आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.