आला 256 जीबी मेमरी, 4 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन

तायवानची कंपनी आसूसने 256 जीबी इंटरनल मेमरी आणि 4 जीबी रॅम असलेला झेनफोन 2 डिलक्स स्पेशल एडिशन स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. फोन अरेनाच्या सूत्रानुसार आसूसने फोन काही दिवसांपूर्वी ब्राझिलमध्ये लॉन्च केलाय. या फोनची खास बात म्हणजे 256 जीबी मेमरीबरोबर वेगळे डिझाइन आहे.

Updated: Aug 27, 2015, 12:26 PM IST
आला 256 जीबी मेमरी, 4 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन title=

मुंबई : तायवानची कंपनी आसूसने 256 जीबी इंटरनल मेमरी आणि 4 जीबी रॅम असलेला झेनफोन 2 डिलक्स स्पेशल एडिशन स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. फोन अरेनाच्या सूत्रानुसार आसूसने फोन काही दिवसांपूर्वी ब्राझिलमध्ये लॉन्च केलाय. या फोनची खास बात म्हणजे 256 जीबी मेमरीबरोबर वेगळे डिझाइन आहे.

या फोनचे मागील बाजू फंकी पॉलिगोनल पॅटर्नचे डिझाइनने बनविण्यात आली आहे. याचा कलर ड्रिफ्ट सिल्वर आणि कार्बन नाईच ठेवण्यात आले आहे. जगभरात स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये अॅपल आणि सॅमसंग या दोन कंपन्यांनी 128 जीबी इंटरनल मेमरी फोन लॉन्च केलेत. यांची किंमत खूपच आहे. आसूसमध्ये 4 जीबी रॅमबरोबर इंटेल एटमची 2.3जीएचझेए क्वॉड कोर प्रोसेसर असणार आहे.

आसूसच्या या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे. फोनची बॅटरी 3000 एमएएच असणार आहे. फोन 5.5 इंट फूल एचडी डिस्प्ले आणि ड्युएल सिम सपोर्ट असणार असून अॅड्रॉईड 5.9 लॉलीपॉपवर काम करणार आहे. मात्र, भारतीय बाजारात या फोनची किती किंमत असेल, याबाबत खुलासा झालेला नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.