पावावरची बुरशी करणार मोबाईल चार्ज?

मुंबई : आजवर अनेक गोष्टींपासून मोबाईलची बॅटरी चार्ज करण्याच्या पद्धती तुम्ही वाचल्या असतील.

Updated: Mar 21, 2016, 05:22 PM IST
पावावरची बुरशी करणार मोबाईल चार्ज? title=

मुंबई : आजवर अनेक गोष्टींपासून मोबाईलची बॅटरी चार्ज करण्याच्या पद्धती तुम्ही वाचल्या असतील. पण, पावावर येणाऱ्या बुरशीपासून मोबाईल फोन चार्ज करता येतो असे सांगितले तर? हो हे शक्य होणार आहे. 

न्यूरोस्पोरा क्रासा नावाची बुरशी पावात अस्तित्वात असते. त्यातील काही घटक मोबाईलच्या बॅटरीमध्ये वापरुन मोबाईलची बॅटरी चार्ज करण्याचे तंत्रज्ञान संशोधक विकसीत करत आहेत. स्कॉटलंड विद्यापीठातील काही संशोधक हे संशोधन करण्यात व्यस्त आहेत. 

या बुरशीत काही विद्युत आणि चुंबकीय घटक असे आहेत ज्यांचा जैवतंत्रज्ञानाच्या आणि सूक्ष्मतंत्रज्ञानाच्या नावे मोबाईलच्या बॅटरी तयार करण्यासाठी वापर करणे शक्य आहे. या बुरशीतील काही घटकांत धातू असतात. या धातूंचा वापर केला जाऊ शकतो. 

त्यामुळे भविष्यात दीर्घकाळ चालणाऱ्या आणि पर्यावरणाला पूरक अशा बॅटरीज तयार करता येण्याची शक्यता आहे.