'बीएसएनएल'चा शिल्लक इंटरनेट बॅलन्स मिळणार

तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करत आहात. मात्र, तुमचा शिल्लक २जी डेटा मिळत नव्हता. परंतु आता तो मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.भारत संचार निगम लिमिटेड अर्थात 'बीएसएनएल'चा शिल्लक इंटरनेट डेटा पुढील रिचार्ज करताना मिळणार आहे.

Updated: May 20, 2015, 05:15 PM IST
'बीएसएनएल'चा शिल्लक इंटरनेट बॅलन्स मिळणार title=

नवी दिल्ली : तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करत आहात. मात्र, तुमचा शिल्लक २जी डेटा मिळत नव्हता. परंतु आता तो मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.भारत संचार निगम लिमिटेड अर्थात 'बीएसएनएल'चा शिल्लक इंटरनेट डेटा पुढील रिचार्ज करताना मिळणार आहे.

यापूर्वी रिचार्जची मुदत संपल्यानंतर शिल्लक राहिलेला डेटा पुन्हा वापरता येत नव्हता. तो फक्त एक महिन्यासाठीच वैध असायचा. बीएसएनएल ही सवलत फक्त २ जी आणि ३ जी मोबाइल इंटरनेट वापरकर्त्यांसाठी लागू करण्यात आल्याचे बीएसएनएलने जाहीर केले आहे. या सवलतीचा लाभ फक्त प्री-पेड ग्राहकांनाच मिळणार आहे. त्यामुळे बीएसएनएल ग्राहकांचा आधीच्या रिचार्जमधील शिल्लक राहिलेला (बॅलन्स) इंटरनेट डेटा पुढील रिचार्ज करताना त्यात जमा होणार आहे. 

एअरटेलने ही सुविधा त्यांच्या ग्राहकांना यापूर्वीच दिली आहे. एअरटेलनंतर आता इतर कंपन्यादेखील उर्वरित डेटा पुढील रिचार्जमध्ये जोडण्यासाठी ही सुविधा आपल्या ग्राहकांना देऊ करत आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.