मिळवा... फूल टॉकटाईम आणि फ्री सिमकार्ड!

स्पर्धेच्या युगात प्रत्येक कंपनी आपल्या उपभोक्त्यांना आकर्षित करण्यासाठी नवीन-नवीन संकल्पनांचा घाट घालत असते. त्यात दिवाळीत तर ऑफर्स वर ऑफर्स...याच दिवाळीच्या मुहूर्ताची संधी साधून बीएसएनएल ने एक नवीन योजना जाहीर केली आहे. ही योजना म्हणजे १०, २० आणि ५० रूपयांच्या टॉप-अप रिचार्जवर फुल टॉकटाइम आणि टू जी आणि थ्री जीचे सिमकार्ड मोफत देण्यात येणार आहे.

Updated: Oct 31, 2013, 01:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्पर्धेच्या युगात प्रत्येक कंपनी आपल्या उपभोक्त्यांना आकर्षित करण्यासाठी नवीन-नवीन संकल्पनांचा घाट घालत असते. त्यात दिवाळीत तर ऑफर्स वर ऑफर्स...याच दिवाळीच्या मुहूर्ताची संधी साधून बीएसएनएल ने एक नवीन योजना जाहीर केली आहे. ही योजना म्हणजे १०, २० आणि ५० रूपयांच्या टॉप-अप रिचार्जवर फुल टॉकटाइम आणि टू जी आणि थ्री जीचे सिमकार्ड मोफत देण्यात येणार आहे.
ग्राहकांना या योजनेचा लाभ १ नोव्हेंबर ते २९ जानेवारी २०१४ या तीन महिन्यांच्या कालावधीत घेता येणार आहे. अशा प्रकारची योजना बीएसएनएलने प्रथमच जाहीर केली आहे. एक नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे असे बीएसएनएलचे अॅडिशनल जनरल मॅनेजर आशिष पाठक यांनी सांगितले.
खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीएसएनएल प्रयत्न करत आहे. यापूर्वी बीएसएनएलने सिमकार्ड मोफत देण्याची योजना लागू केली होती. आता टू जी आणि थ्री जी अशा दोन्ही प्रकारची सिमकार्ड १ नोव्हेंबर ते २९ जानेवारी २०१४ पर्यंत मोफत दिली जाणार आहे, असे पाठक यांनी स्पष्ट केलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.