बीएसएनएल ३जी इंटरनेटच्या दरात करणार ५० टक्क्यांची कपात

एकीकडे मोबाईल इंटरनेटचे दर वाढत असतांना. बीएसएनएलनं ३जी इंटरनेटच्या दरात कमीत कमी ५० टक्क्यांची कपात करण्याची योजना आखलीय. कंपनीला आपल्या नेटवर्कचा विस्तार करायचाय. हा विस्तार पूर्ण झाला की, ३जी इंटरनेट दरांमध्ये घट करणार आहे.

PTI | Updated: Mar 2, 2015, 09:53 PM IST
बीएसएनएल ३जी इंटरनेटच्या दरात करणार ५० टक्क्यांची कपात  title=

बार्सिलोना: एकीकडे मोबाईल इंटरनेटचे दर वाढत असतांना. बीएसएनएलनं ३जी इंटरनेटच्या दरात कमीत कमी ५० टक्क्यांची कपात करण्याची योजना आखलीय. कंपनीला आपल्या नेटवर्कचा विस्तार करायचाय. हा विस्तार पूर्ण झाला की, ३जी इंटरनेट दरांमध्ये घट करणार आहे.

बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितलं, आमच्या आठव्या चरणाच्या नेटवर्क विस्तारा अंतर्गत आमचा अंदाज आहे की, ३जी डेटाच्या दरात कमीतकमी सध्याच्या दराच्या तुलनेत ५० टक्क्यांची घट केली जावू शकते. सध्या बीएसएनएल ३जी मोबाईल इंटरनेटचा प्रस्ताव इतर प्रमुख दूरसंचार कंपन्यांद्वारे घेतल्या जाणाऱ्या २जी दरांवर असते. कंपनी १जीबीची ३जी मोबाईल इंटरनेट सेवा १७५ रुपये आणि २जीबी २५१ रुपयांमध्ये देतात. 

श्रीवास्तव यांनी सांगितलं, आम्ही जवळपास ९० टक्के ३जी क्षमतेचा वापर केलेला आहे. जर आम्ही दरामध्ये तात्काळ कपात केली, तर यामुळे ट्रॅफिकमध्ये अचानक वाढ होईल आणि आम्ही हे ओझं पेलू शकणार नाही. म्हणून आठव्या चरणातील क्षमता विस्तार पूर्ण झाल्यानंतर आम्ही कपात करू शकू. कंपनी सध्या सातव्या चरणाच्या विस्ताराचं काम करत आहे. यासाठी कंपनीला ४,८०० कोटी रुपयांचा खर्च आहे. हा विस्तार यावर्षी जूनपर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.