कमाईचा नवा मार्ग... फ्लिपकार्ट, अमेझॉनसोबत हात मिळवा!

तुम्हाला घरबसल्या तुमचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल तर या ऑप्शनचा तुम्ही नक्की विचार करू शकता... 

Updated: Sep 7, 2016, 07:10 PM IST
कमाईचा नवा मार्ग... फ्लिपकार्ट, अमेझॉनसोबत हात मिळवा! title=

नवी दिल्ली : तुम्हाला घरबसल्या तुमचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल तर या ऑप्शनचा तुम्ही नक्की विचार करू शकता... 

अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांशी जोडलं जाऊन तुम्ही घरबसल्या कमाईही करू शकता. महत्त्वाचं म्हणजे, या कंपन्यांशी जोडलं जाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शुल्क द्यावं लागत नाही. 

कसं जोडलं जाणार या वेबसाईटसना, पाहा...

- तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवर जाऊन सेलर अकाऊंट सुरू करावं लागेल. प्रत्येक वेबसाईटवर हा ऑप्शन उपलब्ध आहे. 

- हे अकाऊंट सुरू करण्यासाठी तुमच्याकडे टिन आणि पॅन कार्ड नंबर असायला हवा. याशिवाय तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही. 

- त्यानंतर या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटसच्या माध्यमातून तुम्ही कपडे, ज्वेलरी, मोबाईल, खेळणी, शूज, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अशा विविध गोष्टी ऑनलाईन विकू शकता. 

- तुमच्या वस्तू या वेबसाईटवर विकण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या काही कमिशन घेतात. वस्तूच्या किंमतींवर हे कमिशन निर्धारित असतं. 

- याशिवाय तुमची वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी शिपिंग चार्जही विक्रेत्याला द्यावा लागतो. हा चार्ज वस्तूच्या वजनावर निश्चित होतो. 

- बाजारात थोडा रिसर्च करून एखाद्या वस्तूची मागणी जास्त असेल तर त्या वस्तूचा निर्माता किंवा होलसेल बाजार शोधून तुम्ही सरळ ग्राहकांशी जोडले जाऊ शकता. 

- ई कॉमर्स कंपन्यांशी जोडलं गेल्यानंतर तुम्ही किती कमाई करू शकाल, याचा कोणताही आकडा सांगता येणार नाही. अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या विक्रेत्यांचा डब्ल्यूएस रिटेल आणि क्लाउडटेलचा टर्नओव्हर हजारो करोड रुपयांमध्ये आहे.