एक महाविद्यालय : दोन प्राचार्य, विद्यार्थ्यांचा खेळखंडोबा

Last Updated: Thursday, August 7, 2014 - 09:23
एक महाविद्यालय : दोन प्राचार्य, विद्यार्थ्यांचा खेळखंडोबा

मुंबई : एक महाविद्यालय आणि दोन प्राचार्य असा शिक्षणाचा खेळखंडोबा सध्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये सुरू आहे. संस्थेवर कब्जा करण्याच्या राजकारणात आपण विद्यार्थ्यांचं नुकसान करतोय, याची साधी जाणीव नेत्यांना नाही. नक्की काय आहे हे प्रकरण?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1953 साली स्थापन केलेलं हे सिद्धार्थ कॉलेज. पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत हे कॉलेज सुरु असलं तरी ही संस्था कोणाची, यावरून वर्षानुवर्षे कोर्टबाजी सुरू आहे. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आणि रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांच्यात हा वाद सुरु आहे. मात्र, या दोघांच्याही भांडणात सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं मात्र, नुकसान होतंय. 

कॉलेजच्या प्राचार्यांच्या दालनात बसणारे हे कृष्णा पाटील आणि त्यांचं निलंबन झाल्याचा दावा करणारे हे प्राभारी प्राचार्य उमाजी म्हस्के. संस्थेचा वाद कोर्टात असल्यानं सध्या मुंबई विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभाग सहसंचालक यांनी विद्यार्थी, पगार आणि पेंशनबाबतचे सर्व अधिकार उमाजी म्हस्के यांना दिले आहेत. पण कृष्णा पाटील हे प्राचार्याचं दालन सोडत नसल्यानं नविन आलेला प्रत्येक विद्यार्थी हा प्रशासकीय कागदपत्रांवर आवश्यक असलेल्या सह्यांसाठी त्यांच्याकडेच जातो. मात्र, पुढे प्रवेश समिती आणि कॅशिअर विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आणि फी पावती रिजेक्ट करतात. त्यामुळं विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

2009 पासून कॉलेजने विद्यापीठाला परीक्षा शुल्काचे पैसेच दिलेले नाहीयेत. तब्बल 33 लाख रुपये परीक्षा शुल्क कॉलेजकडे थकीत आहे. त्यामुळे विद्यापीठानं आता कॉलेजला नोटीस बजावलीय. गेल्या पाच वर्षाचे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क गेले कुठे असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो. सध्या कारभार पाहत असलेले उमाजी म्हस्के यांनी याबाबत पूर्वीचे प्राचार्य कृष्णा म्हस्के यांच्या माथी खापर फोडलंय. दरम्यान, कॉलेजची बँकेची सगळी खाती सील असल्यानं आता एवढी मोठ्ठी रक्कम भरायची कुठुन, असा प्रश्न कॉलेज प्रशासनाला पडलाय.

तर कृष्णा म्हस्के यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. याउलट मुंबई विद्यापीठ, उच्च शिक्षण विभाग सहसंचालक यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. आनंदराज आंबेडकर गट कट रचून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. शिका आणि संघर्ष करा अशी शिकवण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. पण शिक्षण राहिलं बाजूला, आंबेडकरांचे अनुयायी म्हणवणारे नेते आपापसातच संघर्ष करत बसलेत... या राजकारणात भरडले जातायत ते विद्यार्थी. 

दरम्यान,  इतकंच नाही तर 2009 पासून कॉलेजचं तब्बल 33 लाख रुपये परीक्षा शुल्क थकीत आहे.  याबाबत विद्यापीठानं कॉलेजला नोटीस पाठवलीये. तेव्हापासून प्राचार्य असलेल्या कृष्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून वसूल केलेलं परीक्षा शुल्क विद्यापीठाला का दिलं नाही, असा प्रश्न आहे. कॉलेजचं 14 लाख रुपयांचं वीजबीलही थकलंय. कॉलेजची बँक खाती सील करण्यात असल्यामुळे कॉलेज चालवण्यासाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्न आहे. विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभाग बघ्याची भूमिका का घेतायत असा प्रश्न आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 7, 2014 - 09:19
comments powered by Disqus