पुण्याची १३ वर्षांची गायत्रीची डूडल भरारी

गुगल अर्थातच माहितीचा साठा! छोट्या ते मोठ्या शंकांच निरसन गुगलच्या मदतीने होते. पुण्यातील पंधरा वर्षीय गायत्रीने गुगलद्वारा आयोजित ‘२०१३ डूडल ४’ गुगल स्पर्धा जिंकून संपूर्ण शहराचे नाव रोशन केले आहे.

Updated: Nov 16, 2013, 07:49 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पुण्यातील पंधरा वर्षीय गायत्री केथरमण हिने डूडल ४ गुगल २०१३ची स्पर्धा जिंकली. लहान वयात गुगल अर्थातच माहितीचा साठा असणाऱ्या सोशल साईटवर तिचे चित्र झळकले.
डूडलचे शिर्षक ‘Sky’s the limit for Indian Women’ होते. १४ नोव्हेंबर, बालदिनाच्या निमित्ताने या डूडल गुगल इंडियाने होमपेजवर लावले होते. गुगलने दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात गायत्रीला सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला बॉलीवूड स्टार किरण खेर उपस्थित होती.
वेगवेगळ्या दिनानिमित्ताने जगभरातील, वेगवेगळ्या क्षेत्रांत अमूल्य योगदान देणाऱ्या महान कलाकार, नेते, संशोधक यांच्या कर्तृत्वाला सलाम करताना गुगल अधूनमधून आपल्या होमपेज त्या व्यक्तीबाबत आकर्षक असे डूडल वापरते. हे डूडल नेटयुजर्सना आकर्षित करते. याच कारणाने अलिकडच्या दोन-चार दिवसांनी गुगल आपल्या होमपेजवर डूडल प्रसिद्ध करते.
भारतात गुगल दरवर्षी एका खास थीमवर डूडल स्पर्धा देशातील शाळकरी मुलांसाठी आयोजित करत असते. बालदिनाच्या दिवशी गुगल इंडियाच्या होमपेजवर, जिंकणाऱ्याचे डूडल लावले जाते. कंपनीला या स्पर्धेसाठी सुमारे दीड लाखापेक्षा जास्त एंट्रीज मिळाल्या होत्या, असं गुगल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर राजन आनंद यांनी सांगितले.
दीड लाखांच्या या स्पर्धकांतून पुण्याच्या गायत्रीने ही बाजी मारली. विजेत्याच्या आधी १२ फायनलीस्ट सिलेक्ट केले होते. गुगलकडून त्यांना एक क्रोमबुक आणि बक्षिसे देण्यात आली. या वर्षी गुगलचा डूडल किताब जिंकणारी गायत्री पुण्यातील बिशप्स को-एड स्कूलमध्ये दहावीत शिकते. मागील चार वर्षापासून गायत्रीने या स्पर्धेत भाग घेतला होता.
२०११ मध्ये तिचे डूडल ‘India’s giftto the world’ शॉटलिस्ट करण्यात आले होते, यंदा मात्र तिला यश मिळाले. गायत्रीला यंदाच्या स्पर्धेतले डूडल काढण्यासाठी एक आठवडा लागला होता. हे डूडल महिलांना समर्पित केले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.