शाकाहारी प्रवाशांची दुबई, यूके आणि सिंगापूरला पसंती

कॉक्स अँड किंग्जच्या अलिकडे झालेल्या सर्वेक्षणात `सर्वात लोकप्रिय शाकाहार प्रधान ठिकाणे आणि भारतीय शाकाहारानुरुप प्रवाशांचे प्राधान्य ठिकाणे' दर्शवण्यात आली आहेत, दुबई, युनायटेड किंग्डम आणि सिंगापूर या देशांना भारतीय शाकाहारी प्रवाशी प्राधान्य देतात. तर अमेरिका, स्वित्झर्लंड, मलेशिया, इस्रायल, थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश फिरण्यासाठी म्हणून प्रवाशी प्राधान्य देतात. शाकाहारी आणि भारतीय रेस्टॉरंटची वाढती संख्या पाहूनच, येथे भारतीय मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि आता ही ठिकाणे शाकाहारी भारतीय प्रवाशांसाठीची सर्वात लोकप्रिय ठिकाणे झाली आहेत.

Updated: May 19, 2017, 01:10 PM IST
शाकाहारी प्रवाशांची दुबई, यूके आणि सिंगापूरला पसंती

मुंबई : कॉक्स अँड किंग्जच्या अलिकडे झालेल्या सर्वेक्षणात `सर्वात लोकप्रिय शाकाहार प्रधान ठिकाणे आणि भारतीय शाकाहारानुरुप प्रवाशांचे प्राधान्य ठिकाणे' दर्शवण्यात आली आहेत, दुबई, युनायटेड किंग्डम आणि सिंगापूर या देशांना भारतीय शाकाहारी प्रवाशी प्राधान्य देतात. तर अमेरिका, स्वित्झर्लंड, मलेशिया, इस्रायल, थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश फिरण्यासाठी म्हणून प्रवाशी प्राधान्य देतात. शाकाहारी आणि भारतीय रेस्टॉरंटची वाढती संख्या पाहूनच, येथे भारतीय मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि आता ही ठिकाणे शाकाहारी भारतीय प्रवाशांसाठीची सर्वात लोकप्रिय ठिकाणे झाली आहेत.

सहलीचे ठिकाण ठरवताना जेवणाचे प्रकार हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ७० टक्के शाकाहारी प्रवासी त्यांचे फिरण्याचे ठिकाण शाकाहारी जेवणाची उपलब्धता किती आहे यावरून ठरवात. तर उर्वरीत ३० टक्के लोकं ठिकाण ठरवल्यावर मग शाकाहारी जेवणाचे पर्याय शोधतात.

शाकाहाराची खात्री पर्यटनाला चालना देते आणि त्यानुसार निवासस्थानही निवडले जाते. ७१ टक्के शाकाहारी प्रवासी केवळ शाकाहारी जेवण मिळेल यासाठी कॉस्मोपोलिटिअन टूरची निवड करतात. ५३ टक्के शाकाहारी प्रवाशांकडून शाकाहारी रेस्टॉरंटची निवड केली जाते, तर केवळ २० टक्के लोकं विविध प्रकारचे जेवण असलेले हॉटेल पसंद करतात.

याशिवाय तरूण पिढीतील २० ते ४५ वयोगटातील ८५ टक्के कॉस्मोपोलिटिअन टूरला पसंती देतात, असेही सर्वेक्षणातून पुढे आले आहे, कारण येथे त्यांना शाकाहारी अन्न मिळते, तर ४६ ते ६५ वयोगटातील प्रवाशांना मात्र शाकाहारी जेवणाची खात्री असेल तरच ते प्रवास करतात.

जानेवारी ते मार्च 2017 या कालावधीत हे सर्वेक्षण झाले, यात 20 ते 65 या वयोगटातील 500 लोकांची मते घेण्यात आली. या सर्वेक्षणाविषयी कॉक्स अँड किंग्जच्या रिलेशनशीप्स विभागाचे प्रमुख करण आनंद म्हणाले की, `गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तमिळनाडू आदी राज्यांतून शाकाहार उपलब्ध होईल अशा टूरची मागणी वाढत आहे. कॉक्स अँड किंग्जच्या शाकाहाराला प्राधान्य असलेल्या टूर्सना याच राज्यांतून मागणी आहे.'

आणखी एक गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष सहलीच्या जेवणाचे प्रकार कुठले उपलब्ध आहेत यावर सहली किती मोठी असावी हे ठरवले जाते. लहान सहलीत 77 टक्के शाकाहारी प्रवासी नूडल्स, उपमा इत्यादी पदार्थं बरोबर आणतात. आणि दीर्घकालीन सहलीसाठी जायचे (5 दिवसांपेक्षा जास्त) म्हटले तरी हे प्रवासी शाकाहार मिळेल अशाच ठिकाणी जाणे पसंत करतात.

यापैकी शाकाहारासाठी वेगळे किचन किंवा जेवणाचे ठिकाण असेल अशा रेस्टॉरंटना ते अधिक पसंती देतात. याशिवाय सर्वेक्षणात असेही निदर्शनास आले आहे की, 46 ते 65 वयोगटातील 76 टक्के शाकाहारी प्रवासी रेस्टॉरंटबरोबर आहाराची मर्यादा ठरवून घ्यावी असे सांगतात. तर 68 टक्के तरूण प्रवासी, वेगळी जेवणाची सोय नसलेल्या मल्टी कुझिन रेस्टॉरंटमध्येही जमवून घेतात.

सर्वात विश्वासार्ह ट्रॅव्हल एजंट सांगतात, की 57 टक्के लोकांनी आपल्या एजंटबरोबर शाकाहारी रेस्टॉरंट आणि ठिकाणासाठी खात्री करणार असल्याचे सर्वेक्षणानिमित्ताने सांगितले.