आता फेसबुक कर्मचाऱ्यांनाही मिळणार ४ महिन्यांची पॅटर्निटी लीव्ह

 दोन महिन्यांच्या पॅटर्निटी लीव्हवर जाणाऱ्या फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने त्याच्या कर्मचाऱ्यांनाही पॅटर्निटी लीव्ह देण्याचा निर्णय घेतलाय. फेसबुक कंपनी आपल्या फुल टाईम कर्मचाऱ्यांना बाळाच्या जन्मानंतर चार महिन्यांची सुट्टी देणार आहे. विशेष म्हणजे, ही सुट्टी फुलपगारी असणार आहे. 

Updated: Nov 28, 2015, 02:12 PM IST
 आता फेसबुक कर्मचाऱ्यांनाही मिळणार ४ महिन्यांची पॅटर्निटी लीव्ह title=

सॅन फ्रॅन्सिस्को :  दोन महिन्यांच्या पॅटर्निटी लीव्हवर जाणाऱ्या फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने त्याच्या कर्मचाऱ्यांनाही पॅटर्निटी लीव्ह देण्याचा निर्णय घेतलाय. फेसबुक कंपनी आपल्या फुल टाईम कर्मचाऱ्यांना बाळाच्या जन्मानंतर चार महिन्यांची सुट्टी देणार आहे. विशेष म्हणजे, ही सुट्टी फुलपगारी असणार आहे. 

एक जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. फेसबुकच्या माहितीनुसार अमेरिकेबाहेरील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाळाच्या जन्मानंतर चार आठवड्यांची सुट्टी मिळते. मात्र आता या सुट्टीत वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बाळाच्या आईसह वडिलांनाही बाळाच्या संगोपनासाठी चार महिन्यांची भरपगारी सुट्टी मिळणार आहे. 

अमेरिकेच्या बाहेरील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. केवळ मुलाच्या जन्मानंतरच नव्हे तर एखादे जोडपे बाळ दत्तक घेत असेल तर त्यांनाही सुट्टी मिळणार आहे, असे फेसबुकच्या एचआर हेड लॉरी मेटलॉफ गोलर यांनी सांगितलं. तसेच बाळाच्या जन्मानंतर फेसबुक त्या कर्मचाऱ्याला ४ हजार डॉलरचा बोनसही देणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.