फेसबुकवर युजरचा रक्तगट दाखविण्याची विनंती

बांगलादेशमधील एका युजरने मार्क झुकेरबर्ग यांना एक कल्पना सुचविली आहे.  लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने युजर्सच्या 'कव्हर पेज'वर रक्तगट दाखवावा. ज्यामुळे जुळणारा रक्तगट न मिळाल्याने होणारे मृत्यु रोखण्यास मदत होईल, असं या युजरने म्हटलंय.

Updated: Jun 22, 2016, 04:36 PM IST
फेसबुकवर युजरचा रक्तगट दाखविण्याची विनंती title=

मेन्लो पार्क | कॅलिफोर्निया : बांगलादेशमधील एका युजरने मार्क झुकेरबर्ग यांना एक कल्पना सुचविली आहे.  लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने युजर्सच्या 'कव्हर पेज'वर रक्तगट दाखवावा. ज्यामुळे जुळणारा रक्तगट न मिळाल्याने होणारे मृत्यु रोखण्यास मदत होईल, असं या युजरने म्हटलंय.

मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी संध्याकाळी 'इन्स्टाग्राम'बाबत माहिती देणारी पोस्ट लिहिली होती, त्यावर ही प्रतिक्रिया म्हणून कल्पना एकाने मांडली आहे. राबियल इस्लाम नावाच्या एका युजरने फेसबुकच्या 'कव्हर पेज'वर रक्तगट दाखविण्याची कल्पना सुचविली आहे. तसेच राबियलने आपण विद्यार्थी असून बांगलादेशमधील असल्याचे प्रतिक्रियेत लिहिले आहे.

'झुकेरबर्ग तुम्हाला माहिती आहे प्रत्येक क्षणाला अनेक जण रुग्णालयात दाखल होत असतात. त्यापैकी अनेक जण जुळणारा रक्तगट न मिळाल्याने मृत्युमुखी पडत असतात. जर फेसबुकने प्रत्येक युजरला रक्तगट दाखविण्याची  सुविधा उपलब्ध करून दिली तर त्याचा मोठा लाभ होऊ शकेल', अशी सूचना राबियलने केली आहे. 

तसेच फेसबुक नेहमीच मानवकल्याणाचा विचार करत असून आपल्या सूचनेकडे दुर्लक्ष न करता त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्याच्या सूचनेचे इतर युजर्सनी स्वागत केले आहे, राबियलच्या प्रतिक्रियेला साडे सहा हजारपेक्षा अधिक लाईक्‍स मिळाल्या असून १००० पेक्षा अधिक जणांनी त्याच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.