ये लेटेस्ट फॅशन का जमाना है बॉस!

By Shubhangi Palve | Last Updated: Tuesday, May 14, 2013 - 12:27

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नेल आर्टच्या माध्यमातून नखांना वेगवेगळ्या डिझाइन, चमक आणि स्टोन्स लावून सजविले जातं. आजकाल मॉल्सच्या व्यतिरिक्त ब्युटी पार्लरमध्येसुद्धा नेल आर्ट स्पेशालिस्ट दिसतात. कॉलेजमध्ये जाणार्यास तरूणींपासून तर वयस्कर महिला आपला ड्रेस व साडीला मॅचिंग नेल आर्टचा वापर करत असतात.
नेल आर्ट म्हणजे काय तर वेगवेगळ्या पध्दतीनं नखं सजविणं... मूळ रूपात याला ‘आर्टिफिशिअल नेल टेक्नॉलॉजी’ म्हटलं जातं. अमेरिकेत जवळपास ३० वर्षांआधी याची सुरूवात झाली. यात रंगबिरंगी नेलपेंटपासून छोटे छोटे तारे, मोती यांचा वापर केला जातो. यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये वेगळी जागा राखून ठेवली जाते. स्त्रिया वाट्टेल तितके पैसे खर्च करून नखे सजवितात.
नेल आर्ट केल्याने साधारण दिसणार्याग महिलांमध्ये ‘ट्रेंडी लूक’ येतो. पण हे करण्यात सर्वात जास्त लक्ष ठेवण्यासारखे म्हणजे नेल पेन्टच्या ब्रान्ड नेहमी चांगला असावा, नाहीतर नख पिवळे पडून लवकर तुटतात. नखांना रंगवताना नेहमी त्यात रंगांचा वापर केला पाहिजे. मात्र, त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. आजच्या फॅशनेबल युगात नेल आर्टसोबत नेल ज्वेलरीसुद्धा वापरली जाते.

गुरगावमध्ये (दिल्ली) तर एक आंतराष्ट्रीय नेल एक्सपर्ट `नेल पार्लर` चालू करत आहेत. या पार्लरमध्ये नेल आर्ट मशीन आहे. या मशीनमध्ये जवळपास २५०० नेल डिझाईन आहेत. याचा उपयोग करणे खूपच सोपे असते. फक्त आपली आवडती डिझाईन निवडायची व मशीनखाली आपली नखं ठेवायची. काही वेळातच आपली आवडती डिझाईन नखांवर येते. या मशिनने आपल्या आवडत्या व्यक्तीचा फोटोसुध्दा स्कॅन करून नखांवर छापता येतो.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Tuesday, May 14, 2013 - 11:01


comments powered by Disqus