फिंगरप्रिंट सेंसरचा स्वस्त स्मार्टफोन लाँच

चीनच्या कूलपॅड या कंपनींने ३ जीबी रॅम असणारा आणि फिंगरप्रिंट सेंसर असणारा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

Updated: Jan 16, 2016, 04:44 PM IST
फिंगरप्रिंट सेंसरचा स्वस्त स्मार्टफोन लाँच title=

मुंबई : चीनच्या कूलपॅड या कंपनींने ३ जीबी रॅम असणारा आणि फिंगरप्रिंट सेंसर असणारा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कूलपॅड नोट ३ लाईट या स्मार्टफोनची किंमत आहे फक्त ७ हजार रुपये. या फोन अमेझॉन इंडिया या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

५ इंच एचडी स्क्रीन आणि १.३ गिगाहर्त्झ क्वाडकोर प्रोसेसर या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे.

कूलपॅड नोट ३ लाईटची वैशिष्टे :

प्रोसेसर : 1.3 गिगाहर्त्झ मिडियाटेक क्वाडकोर 

रॅम : 3 जीबी

कॅमेरा : 13 मेगापिक्सल रियर, 5 मेगापिक्सल फ्रंट

डिस्प्ले : 5 इंच 

मेमरी : 16 जीबी इंटरनल आणि ६४ जीबी एक्सटरनल

बॅट्री : 2,500 मेगाहर्टझ (कस्टम यूआई)

ओएस : अँड्रॉइड 5.1