१ मिनिटात मिळवा हरवलेला मोबाईल फोन

अनेकदा असं होतं की फोन कुठे तरी पडून जातो किंवा चोरी होतो. अशा वेळेत काही मिनिटानंतर आपल्याला आपल्या फोनची आठवण येते. पण असं झाल्यास काही मिनिटात तुम्ही तुमचा मोबाईल पुन्हा मिळवू शकता.

Updated: Mar 13, 2016, 05:18 PM IST
१ मिनिटात मिळवा हरवलेला मोबाईल फोन title=

मुंबई : अनेकदा असं होतं की फोन कुठे तरी पडून जातो किंवा चोरी होतो. अशा वेळेत काही मिनिटानंतर आपल्याला आपल्या फोनची आठवण येते. पण असं झाल्यास काही मिनिटात तुम्ही तुमचा मोबाईल पुन्हा मिळवू शकता.

१. सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्य ज्या गूगल आयडीने लॉगइन केलंय त्या आयडीने दुसऱ्या ठिकाणी लॉगइन करा.

२. लॉगइन झाल्यानंतर होमपेजवर जाऊन सर्च बारवर 'Where is my Phone? टाईप करा. त्यानंतर एक मॅप उघडेल. 

३. ज्या फोनमध्ये तुम्ही आधी गूगल अकाउंट वापरत होता त्या फोनचं लोकेशन तुम्हाला दिसेल. गूगल तुमच्या मोबाईल फोन ट्रेस करुन तुमचा फोन कुठे आहे ते सांगेल.

४. तुमचा फोन साईलेंट मोडवर जरी असला तर तुम्हाला एक ऑप्शन ही दिलं जातं. मॅपच्या खालीच ते ऑप्शन तुम्हाला दिसेल. फक्त तुमच्या मोबाईलची बॅटरी संपायला नको.