या वेबसाईटवर मिळणार जिओचं फ्री सिमकार्ड

जर तुम्हाला अजून रिलायन्स जिओचं सिमकार्ड मिळालं नसेल तर निराश होऊ नका. आता तुम्हाला ते फ्रीमध्ये लवकरच मिळणार आहे. ई-कॉमर्स साईट शॉपक्लूज (Shopclues) ने रिलायन्स जिओसोबत करार केला आहे. जिओसोबत करार करणारी ही पहिली ई-कॉमर्स कंपनी ठरली आहे.

Updated: Sep 25, 2016, 02:06 PM IST
या वेबसाईटवर मिळणार जिओचं फ्री सिमकार्ड title=

मुंबई : जर तुम्हाला अजून रिलायन्स जिओचं सिमकार्ड मिळालं नसेल तर निराश होऊ नका. आता तुम्हाला ते फ्रीमध्ये लवकरच मिळणार आहे. ई-कॉमर्स साईट शॉपक्लूज (Shopclues) ने रिलायन्स जिओसोबत करार केला आहे. जिओसोबत करार करणारी ही पहिली ई-कॉमर्स कंपनी ठरली आहे.

फ्रीमध्ये मिळणार जिओ सिम

रिलायन्स सोबत करार केल्यानंतर शॉपक्लूज भारतात सिमकार्ड विकणारी पहिली कंपनी ठरली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ते यूजर्सला फ्रीमध्ये जिओ सिम देणार आहे. पण यासाठी युजर्सला ४जी स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे.

यूजर्स त्यांची आवडती स्मार्टफोन कंपनी निवडू शकतात. लेनेवो, माइक्रोमॅक्स, असूस, पॅनासॉनिक, HTC,सॅमसंग आणि इंटेक्स या कंपन्यांचा समावेश आहे. शॉपक्लूज या स्मार्टफोनवर यूजर्सला डिस्काउंट देखील देणार आहे.