SMS द्वारे वीजबिल मिळवा तुमच्या मोबाईलवर

महावितरणची वीज तुम्ही वापरताय... पण, तुमचं वीजबिल वेळेवर येत नाही... किंवा तुमचं वीजबिल तुमच्या पत्त्यावर यायला काही कारणास्तव अडचणी येत असतील तर तुमच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. वीजबिल तुमच्या फोनवर मिळवण्याचा...

Updated: Oct 21, 2016, 09:54 AM IST
SMS द्वारे वीजबिल मिळवा तुमच्या मोबाईलवर  title=

मुंबई : महावितरणची वीज तुम्ही वापरताय... पण, तुमचं वीजबिल वेळेवर येत नाही... किंवा तुमचं वीजबिल तुमच्या पत्त्यावर यायला काही कारणास्तव अडचणी येत असतील तर तुमच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. वीजबिल तुमच्या फोनवर मिळवण्याचा...

तुमचं वीजबिल तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळवण्यासाठी तुम्हाला केवळ एकदा एक एमएमएस महावितरण प्रशासनाला धाडायचा आहे.

यासाठी काय कराल...

- तुमच्या मोबाईलवर एसएमएस टाईप करा : MREG_(तुमचा १२ अंकी वीजग्राहक क्रमांक) उदा. MREG 123456789098

- हा ग्राहक क्रमांक तुमच्या वीजबिलावर तुम्हाला मिळेल

- हा एसएमएस तुम्हाला पाठवायचाय  9225592255 या क्रमांकावर

किंवा तुम्ही महावितरणच्या वेबसाईटवरदेखील तुमचा मोबाईल रजिस्टर करू शकता

- यासाठी http://billing.mahadiscom.in/getsms.php या वेबपेजवर जा

- इथे सर्वप्रथम तुमचा ग्राहक क्रमांक नोंदवा

- त्याखाली तुम्हाला ज्या मोबाईलवर बिल मिळवायचंय तो मोबाईल क्रमांक

- आणि क्लिक करा submit वर

आहे की नाही सोप्पं...