'आयटी'मधील तरूणी सोशल नेटवर्किंगची बळी

सोशल नेटवर्किंगवर ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, नसेल याचा अंदाज येत नाही, म्हणून जोपर्यंत अशा व्यक्तीची पूर्णपणे ओळख होत नाही, तोपर्यंत लांब राहणे अगदी महत्वाचे आहे.

Updated: Jan 21, 2016, 05:28 PM IST
'आयटी'मधील तरूणी सोशल नेटवर्किंगची बळी title=

बंगळुरू : सोशल नेटवर्किंगवर ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, नसेल याचा अंदाज येत नाही, म्हणून जोपर्यंत अशा व्यक्तीची पूर्णपणे ओळख होत नाही, तोपर्यंत लांब राहणे अगदी महत्वाचे आहे.

बंगळुरूत आयबीएम कंपनीत ३१ वर्षाची कुसूम काम करत होती. मात्र मंगळवारी कुसूम रक्ताच्या थारोळ्या पडली असल्याचं तिच्या रूम पार्टनर तरूणीला दिसलं.

पोलिसांनी या हत्येचा शोध २४ तासांच्या आत लावला, हरियाणाच्या सुखबीर सिंगने या खून केल्याचं समोर आलं, सुखबीर आणि कुसूमची ओळख फेसबुकवर तीन महिन्यापूर्वी झाली होती.

सुखबीर हा बंगळुरूत कुसूमकडे आला, त्याने तिच्याकडे ५० हजारांची मागणी केली, तिच्याकडे पैसे नव्हते, म्हणून ५ हजार दे, म्हणून सुखबीरने आग्रह धरला. सुखबीर-कुसूमचं जोरदार भांडण झालं, सुखबीरने लॅपटॉपच्या वायरीने तिचा गळा आवळला, तसेच धारदार शस्त्राने वार केले, कुसूमने जागीच जीव सोडला.