दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी सोनं लुटलं!

Updated: Oct 4, 2014, 08:01 PM IST
दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी सोनं लुटलं! title=

 

मुंबईः ‘विजयादशमी’ हा साडेतीन मुहूर्तपैकी एक मुहूर्त आहे. या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी मुंबईकरांची सराफच्या दुकानात झुंबड उडाली होती. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात कमालीची घट झालेली दिसून येते. तोळ्यामागे सोन्याचा दर 27 हजारांच्या जवळपास आहे. तर चांदी 40 हजारच्या खाली आल्यामुळे दागिन्याची देखील मागणी वाढली आहे.

 

सोन्याचे नाणे, अंगठी आणि अन्य दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला आहे. दिवाळीमध्ये सोन्याच्या दागिन्यात अधिक खरेदी होण्याची शक्यता असणार आहे.

 

त्याचबरोबर घरांच्या नोंदणी वाढविण्यासाठी गृहनिर्माण विकासकांकडून अनेक सूट आणि सवलतींवर जोरदार दिलेला यंदा दिसून येतोय. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घर नोंदणीच्या आकडेवाढीत वाढ झालेली दिसून येते. घर नोंदणीच्या बाजारात प्रति चौरस फूटमागे 5 टक्क्यांपर्यंची सवलत देण्यात आली आहे.  

 

या मुहूर्तावर वाहने खरेदी करण्यासाठी वाहन चालकांनी दुकानात गर्दी गेली होती. पण, यंदा वाहनांच्या बाजारात फार वाहने उतरलेली नाहीत. दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक वाहने बाजार येण्याची चिन्हे दिसत आहे. त्याचबरोबर वाहन खरेदी करण्यासाठी लोकांना सवलती देण्यात येणार आहे. जसे चार चाकी वाहनांवर 50 हजार रुपयांपर्यंतची सूट तर दुचाकी वाहनांसोबत भेट वस्तू देखील देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.